मुंबई:-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यभरातील मोठ्या संख्येने महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान राज्य सरकारकडून महिलांसाठी खूशखबर आहे. यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आली होती. मात्र सरकारने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला असून सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिला अर्ज करू शकतील. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.*
*👉🟥🟥👉सध्या अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन सणापूर्वीच सरकारने महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये वर्ग केल्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला दिसून येत आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता, आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये मिळणार आहेत.*
*👉🛑🛑👉ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेत, आणि पहिल्या लाभ न मिळालेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे 4500 रुपये मिळतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये खात्यात जमा होतील. दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती. मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, जवळपास 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊनदेखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बँक सिडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की, या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल.*