*मॉस्को:- युक्रेनने रशियावर आज सोमवारी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. युक्रेनी सेनेकडून रशियाच्या सारातोव येथील सर्वात उंच इमारतीवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रमाणे भासणारा हल्ला युक्रेनने रशियामध्ये केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.*

*👉🔴🔴👉याआधी शुक्रवारी सकाळी मोरोवोस्क एअर बेसवर युक्रेनकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सहा रशियन फायटर-बॉम्बर्स युक्रेनने नष्ट केले होते. शुक्रवारी युक्रेनने केलेल्या हल्ल्यात आठ विमानांचं मोठं नुकसान झालं असून २० रशियन सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनने आतापर्यंत कदाचित पहिल्यांदाच अधिकृतपणे रशियावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. रशियातील स्थानिक टेलीग्राम चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी आतापर्यंत ५० हून अधिक स्फोटकांची गणना केली आहे. या हल्ल्यात कोणी स्थानिक जखमी झालं नव्हतं. मात्र हल्ल्यात इलेक्ट्रिक सबस्टेशनचं नुकसान झालं आहे. यामुळे ६०० कुटुंबांना वीजेशिवाय राहावं लागलं होतं. तर या हल्ल्यात काही इमारतींचं नुकसान झालं होतं.*

*👉🟥🟥👉त्यानंतर आता सोमवारी पुन्हा एकदा युक्रेनने रशियातील सर्वात उंच इमारतीवर ड्रोनद्वारे हल्ला करुन एकच खळबळ माजवली आहे. राज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी मॉस्कोच्या दक्षिण-पूर्वेकडील जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सेरातोव आणि एंगेल्स या प्रदेशातील प्रमुख शहरात आपत्कालीन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या हल्ल्याची युक्रेनला जबर किंमत मोजावी लागू शकते. असा दावा आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. तसेच या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया यु्क्रेनवर मोठा हल्ला करू शकतो. दरम्यान, युक्रेनने मागच्या आठवड्यात रशियावर असाच ड्रोन हल्ला केला होता. त्यावेळी युक्रेनने रशियाच्या दिशेने ४५ ड्रोन पाठवले होते. मात्र रशियाने हे सर्व ड्रोन नष्ट करून टाकले होते.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!