विधानसभेपूर्वी इंदापूरात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता;
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकण्याच्या तयारीत?

*पुणे:-भाजप पक्षातील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर मतदारसंघाची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच मिळणार असल्याची शक्यता असल्याने हर्षवर्धन पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसत आहे.*

*👉🟥🟥👉राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभाजन झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महायुतीमध्ये गेल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. तसेच विद्यमान आमदारालाच तिकीट देण्याचा नियम महायुतीने ठरवला असल्याने इतर पक्षांच्या नेत्यांनी वेगळा पर्याय पाहण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरच्या कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याने समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता हर्षवर्धन पाटील देखील असा निर्णय घेणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक केले आहे.*

*👉🔴🔴👉शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या परिवाराचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरवासीय आणि महाराष्ट्र हिताचाच निर्णय घेतील, त्यांना माझ्या शुभेच्छा. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या विधानामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन पाटील हे भाजपाच्या तिकिटावर इंदापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र, सध्या हा मतदारसंघ अजित पवार यांच्या ताब्यात आहेत. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2019 साली त्यांनी कमी मताधिक्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!