जळगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चे महासंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला.*
*👉🔴🔴👉मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे, असं म्हटलं होतं. लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचं अभियान नाही, पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचं महाअभियान आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज देश विकसीत होत असताना मातृशक्ती पुढे आल्या आहेत. राज्यातील सर्व बहिणी अत्यंत चांगलं काम करत आहे. तुमच्या सगळ्यात माँ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंची छाप पाहत आहे. मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे, असं म्हटलं होतं. म्हणजे सर्व स्वावलंबी आहेत. त्यांची एक वर्षाची कमाई एक लाखाहून अधिक असेल. काही वर्षात १ कोटी लखपती दिदी झाल्या. तर दोन महिन्यात ११ लाख अजून लखपती दिदी त्यात अॅड झाल्या. नव्या ११ लाख लखपती दिदी झाल्या. यातही एक लाख नवीन लखपती दिदी आपल्या राज्यात तयार झाल्या आहेत. यात येथील महायुतीच्या सरकारनेही मोठी मेहनत घेतली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.*
*👉🟥🟥👉शिंदेंच्या टीमने माता बहिणींना सशक्त करण्यासाठी कामाला लागली आहे. महिला, तरुण, शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक योजना, नवनवीन योजना आणल्या जात आहेत. लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचं अभियान नाही. पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचं महाअभियान आहे. गावाच्या अर्थव्यवस्थेला बदलायचं आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. या मैदानातील प्रत्येक बहीण, मुलीला चांगलं माहीत आहे की, जेव्हा त्या कमावतात, तेव्हा त्यांचा अधिकार वाढतो. घरात त्यांचा सन्मान वाढतो. जेव्हा महिलांची कमाई वाढते तेव्हा घरातील लोकांकडे खर्चासाठी पैसा मिळतो. लखपती दिदी मुळे कुटुंबाचं कायापालट होत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.*
*👉🔴🔴👉महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल,. पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो, आणि राजकीय पक्षांना सांगतो, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.*