*कीव:-रशिया आणि युक्रेनने सध्या सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर हे वक्तव्य केले. चर्चेदरम्यान दोन्ही देशांत चार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.*

 

*👉🔴🔴👉पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांची गळाभेट घेतल्यानंतर सांगितले कि, शांततेसाठी दोन्ही देशात संवाद गरजेचा आहे. रशियासोबत बसून शांततेचा मार्ग शोधला पाहिजे. भारत कधीच तटस्थ नव्हता, तर तो नेहमीच शांततेच्या बाजूने होता,’ असे आश्वासक मत व्यक्त केले. युद्ध थांबविण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र यावे, मी भगवान गौतम बुद्धांच्या भूमीतून आलो आहे, जेथे युद्धाला स्थान नाही, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. यावेळी दोन्ही नेत्यांत व्यापार, आर्थिक, संरक्षण, औषधी, कृषी, शिक्षण आदींबाबत चर्चा झाली. रशिया आणि यूक्रेन दरम्यान युद्ध सुरु आहे.*

 

*👉🅾️🅾️👉त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेन दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेनी राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्कीसोबत दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्याबाबत चर्चा केली. नरेंद्र मोदी यांचा दौरा संवेदनशील होता. कारण भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. त्यामुळे यूक्रेनमध्ये भारतासंदर्भात असंतोष निर्माण झाला होता. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ओसिसमधील पीस पार्कमध्ये महात्मा गांधींची प्रतिमा अनावरण करण्यासाठी पोहचले तेव्हा सुरक्षा अधिक कडक केली गेली. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने तटबंदी केली. एसपीजीने पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी बुलेट रजिस्टँट शील्ड लावली होती.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!