विधानसभा निवडणूका : अब आयेगा मजा !!
या देशातल्या समस्त मुसलमानांचे मनापासून अभिनंदन ज्यांनी भाजपा आणि त्यांच्या मान्यवर नेत्यांना लोकसभा निवडणुकीत थेट जमिनिवर आणून ठेवले, यानंतरची देशातली भाजपा आणि शहा तसेच मोदी फार वेगळ्या पद्धतिने हा देश आणि त्यांची आघाडी सांभाळतील, मोदी पुन्हा पूर्वीच्या लोकप्रियतेवर विराजमान होत आणि सरसंघचालकांशी जुकवून घेत समस्त भारतीयांना मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा भाजपा नजदिक आणून ठेवतील. राष्ट्र असो अथवा हे राज्य, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नेत्यांची प्रत्येक चाल विचारपूर्वक असेल ज्यात गर्व किंवा अतिआत्मविश्वासाची भाषा वर्तणूक वागणूक आणि निर्णय अजिबात नसतील किंबहुना विधानसभा निवडणूक पुढे ढकलून ती दिवाळीनंतर लगेच पूर्ण तयारीनिशी घेण्याचे जे नक्की ठरले आहे तो तर त्यांचा अलीकडील अत्युत्तम निर्णय आहे, महायुती बळकट करण्यासाठी त्याचवेळी महाआघाडीत अस्थिर वातावरण निर्मितीसाठी उचललेले हे पाऊल चाणक्यनीतीचा उत्तम नमुना ठरेल. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांची आपापसात घट्ट होणारी मैत्री त्याचवेळी महाघाडीत सैल पडत चाललेली मैत्रीची विश्वासाची पकड, महायुतीबाबत नक्कीच सकारात्मक बदल आणि वातावरण झपाट्याने बदलते आहे. जो अत्यंत चुकीचा निर्णय समरजितसिंग घाडगे यांनी घेतला तसा घाईगर्दीचा निर्णय राज्यातल्या इतरांनी घेतांना यापुढे विचार करणे गरजेचे आहे. विधानपरिषदेवर जाण्याची तयारी वास्तविक घाडगे यांनी आधी दाखविली नंतर पुन्हा अचानक निर्णय बदलला त्यांनी तेथेच मोठे राजकीय नुकसान करवून घेतले, जरी येणारी विधानसभा समरजितसिंग घाडगे आता महाआघाडीतर्फे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढविणार असले तरी तेथे आजच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ हेच नक्की निवडून येतील, घाडगे यांनी पक्षांतर करून जसे स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले आहे तसे चुकीचे निर्णय घेताना इतरांनी विचार करणे गरजेचे आहे. तिकडे हर्षवर्धन पाटलांचा देखील नेमका गोंधळ उडालेला आहे म्हणजे विधानसभा काँग्रेसतर्फे लढवायची कि पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडून येत जिकडे फायदा तिकडे वायदा पद्धतीने 1995 पद्धतीने भूमिका घ्यायची त्यावर त्यांचा अद्याप नेमका निर्णय जरी होत नसला तरी शरद पवारांनी मात्र हर्षवर्धन पाटील जर अपक्ष निवडणूक लढवीत असतील तर आपणही महाआघाडीचा उमेदवार उभा करूया, असे पटोले आणि उद्धवजींना स्पष्ट सांगून ठेवलेले आहे…
शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात महाआघाडीने पुकारलेला बंद ज्याचा धसका नेमका महायुतीने घेतलेला होता कारण बंद मध्ये उद्धव सेना सहभागी असल्याने तो यशस्वी ठरणार हे नक्की होते जे यादिवसात महायुतीला परवडणारे नसल्याने त्यांचे नेते अस्वस्थ होते पण महायुतीची काळजी महाआघाडीच्या शरद पवार यांनी दूर केली आणि आघाडीची वाढविली, मी राज्यात जे घडवू शकतो घडवून आणू शकतो क्षणार्धात ते बिघडवू देखील शकतो हे पवार यांना आपल्याच महाआघाडीला दाखवून द्यायचे होते ते त्यांनी दाखवून दिले, मी वर जे सांगितले तेच नेमके सत्य आहे, या दिवसात महाआघाडी मध्ये सारेकाही अजिबात अलबेल नाही, पवारांनी केवळ एका वाक्यात बंद मधली हवा काढून तर घेतलीच पण तिकडे आपल्या महाआघाडीच्या समस्त नेत्यांना हवालदिल करून सोडले. आता महाआघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते मनापासून अस्वस्थ आहेत त्यांची अवस्था दुसरीकडे प्रेमात पडलेला नवरा त्याच्या अस्वस्थ बायकोसारखी काहीशी संशयी झालेली आहे. मुख्यमंत्रीपद जर शरद पवार गटाकडे देण्यास आताच इतर घटक पक्ष मान्य करणार नसतील तर हेच पवार राज्यातल्या काँग्रेस किंवा उद्धवसेनेची ताकद घटविण्यात नक्कीच वेगळे डाव खेळून मोकळे होतील. वास्तविक, आम्ही बंद मागे घेत आहोत, अशी घोषणा करण्यापूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस आणि उबाठा गटातील नेत्यांशी चर्चा देखील केली नाही. पवारांनी परस्पर आपला निर्णय जाहीर करण्यापूर्वी किमान आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, खाजगीत एकेरी नावाने उल्लेख करीत नाना पटोले यांनी पवार यांचा जाहीर बैठकीत उद्धार केला आहे तिकडे शिंदे अजितदादा आणि फडणवीसांनी रात्री शॅम्पेन फोडली कि नाही अद्याप नेमकी माहिती मला नाही पण एकनाथ सभोवताली गोल गोल गिरक्या घेत नाचल्याचे माझ्या कानावर पडले आहे. यादिवसात निदान शरद पवारांना दुखविणे उद्धव यांना अजिबातच शक्य नसल्याने त्यांनी काहीशा नाराजीने पत्रकार परिषद घेत बंद मागे घेण्याच्या भूमिकेला दुजोरा दिला खरा पण रात्री उशीरपर्यंत म्हणे उद्धव यांना काही केल्या झोप लागत नव्हती तिकडे नागपुरात विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी प्रेससमोर जबाबदारी थेट पटोलेंवर ढकलली. शरद पवार यांच्याकडे एकाचवेळी अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यामुळे जर त्यांचा मुख्यमंत्री जाहीर केल्या जाणार नसेल तर आजची महाआघाडी उद्याऐवजी आजच बिघडली हे स्पष्ट आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी