15 ऑगस्ट 2024 वार गुरुवार रोजी चेतना फाउंडेशन संचलित चेतना इंटरनॅशनल स्कूल व कॉलेज या ठिकाणी 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय उदय देशपांडे, सचिव विलास भोसले , खजिनदार सोमनाथ माने, सदस्य निकिता माने मॅडम, फार्मसी प्रिन्सिपल नेहा काजळे मॅडम, स्कूल प्रिन्सिपल सुधीर करगळ सर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर शिक्षण अधिकारी मा.अजिंक्य खरात साहेब तसेच कारगिल विजेते खिल्लारे सर ,माझी पी.एस.आय चांगदेव शेंडगे उपस्थित होते.
खरात साहेब यांच्या हस्ते चेतना फाउंडेशनच्या क्रीडांगणावर ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले. कवायत व लेझीम यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आपले प्राविण्य दाखवले. मा. खरात साहेबांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन यातील फरक सांगितला तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले.
तसेच वैष्णवी डोईफोडे ,प्रांजली सुतार व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार मेघना जगताप यांनी केले व कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.