मुंबई:-विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हा लागते? याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. २० सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर ३१ ऑगस्टपर्यंत काढण्याचे आदेश दिले आहेत. २० सप्टेंबरला आचारसंहिता लागली तर पुढे विकासकामे करता येणार नाहीत. त्यामुळे निधी खर्चाबाबत सरकार क्रियाशील असल्याचे समजते.*
*👉🟥🟥👉दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी २० सप्टेंबरला आचारसंहिता लागण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होणार असल्याने कोकणात गणेशोत्सवात निवडणुकीचा प्रचार होण्याची शक्यता आहे.*