
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आज चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज सरडेवाडी ,तालुका इंदापूर जिल्हा पुणे या शाळेवरती आज दिनांक 21/6/ 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पतंजली योग समिती इंदापूर तहसील प्रभारी मल्हारी घाडगे सर व पतंजली योग समिती युवा प्रभारी विलास चोपडे त्याचप्रमाणे चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय उदय देशपांडे, सर सचिव विलास भोसले, सर खजिनदार सोमनाथ माने सर ,स्कूल प्रिन्सिपल निकिता माने मॅडम ,कॅम्पस इन्चार्ज सुधीर करगळ सर उपस्थित होते.
पतंजली योग समितीच्या शिक्षकांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली
पतंजली योग समिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग प्राणायामाचे प्रात्यक्षिते दाखवून संगीताच्या तालावर योग प्राणायाम करून घेतला. त्याच प्रकारे मल्हारी घाडगे सर यांनी लहान मुलांची वैचारिक व शारीरिक तसेच मानसिक क्षमता वाढ होण्यासाठी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी योग किती महत्त्वपूर्ण आहे व ही समाजाची व देशाची गरज आहे हे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्राचार्य निकिता माने मॅडम यांनी उपस्थितांचा येथोचित सन्मान केला. व सुधीर करगळ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
