नवी दिल्ली:-देशात लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंपर मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के आणि महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान झाले.*

*👉🟥🟥👉लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. 21 राज्यातील 102 जागांवर एकूण 1600 उमेदवार उभे होते. त्यांचं भवितव्य मतदारांनी ईव्हीएममध्ये बंद केलं. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. देशात सरासरी 59.71% नोंद झाली आहे. मतदानात पश्चिम बंगालने बाजी मारली. पश्चिम बंगालमधअये तब्बल 77.57% टक्के मतदान झालं. तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. बिहारमध्ये 46.32 मतदान झालं.*

*👉🅾️🅾️👉महाराष्ट्रात आज पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 57.06 टक्के मतदान झालं. पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर या मतदार संघात मतदान झालं. 102 जागांवर 16.63 कोटी मतदार होते. यात 8.4 कोटी पुरुष, 8.23 कोटी महिला आणि 11,371 ट्रान्सजेंडर मतदार होते. 35.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार होते. 13.89 लाख दिव्यांग मतदारांचा समावेश होता. त्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!