पोलिसांनाही आता निवृत्ती वेतन योजना लागू होणार;
केंद्र सरकारच्या धरतीवर जुनी पेन्शन मिळणार,
पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा

*👉🅾️🅾️👉पोलीस दलातील एक नोव्हेंबर 2005 नंतर भरती झालेल्या जवानांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी येत्या 12 एप्रिल पर्यंत आपले अर्ज आणि संबंधित भरतीची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई सह राज्यभरातील दोन लाख वीस हजार पैकी अर्ध्यांपेक्षा अधिक जवानांना याचा फायदा होणार असल्याचे वृत्त आहे.*

*👉🟣🟣👉याबाबत पोलिसांच्या कनिष्ठ आस्थापना शाखेने पोलिसांना विहित मुदतीत पात्र पोलिसांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन पोलीस सेवेत रुजू झालेल्यांना केंद्र शासनाच्या धरतीवर निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस दलात सूचना देण्यात आल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालगतच्या अधिपत्याखालील सर्व अप्पर पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त कार्यालय आणि सर्व शाखा व कार्यालय येथील प्रशासकीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले होते.*

*👉🛑🛑👉सूचनेत काय म्हटले आहे?*

*वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुचित करून एक नोव्हेंबर 2005 सेवेत आलेल्या पोलिसांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. या सूचनेत म्हटले आहे की शासन निर्णयानुसार एक नोव्हेंबर 2005 पूर्वी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेले आणि या तारखेनंतर पोलीस दलात रुजू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी आपल्या अधिपत्याखालील संबंधित पोलीस अंमलदार यांनी सन 2004 व 2005 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पोलीस भरती जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज प्राप्त करून घ्यावेत त्याचे पोलीस अंमलदार एक नोव्हेंबर 2005 नंतर भरती झालेले आहेत ते या योजनेसाठी पात्र ठरतील.*

*👉🔴🔴👉12 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत,*

*संबंधित पोलीस अंमलदार यांनी आपापल्या प्रादेशिक विभाग अथवा शाखा कार्यालय येथे अर्ज करतेवेळी अर्जासोबत सन 2004 व 2005 मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात व नियुक्ती आदेशाची प्रत जोडावी या अर्जाची प्रादेशिक विभाग तसेच शाखा कार्यालय यांनी परिपूर्ण पडताळणी करून फक्त पात्र पोलीस अंमलदारांचे अर्ज 12 एप्रिल पर्यंत कक्ष -9( कनिष्ठ आस्थापना ) येथे सादर करावे. उर्वरित अपात्र अर्ज आपल्या कार्यालयाच्या स्तरावर दप्तरी दाखल करून संबंधित पोलीस अंमलदार यांना तसे अवगत करावे. दिनांक अर्ज प्राप्त न झाल्यास त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!