मुंबई:- अरबी समुद्रात पुन्हा एकदा भारतीय नौदलाने आपली ताकद दाखवून दिली आहे. तब्बल तीन महिने सोमालीयन चाच्यांच्या ताब्यात असलेल्या जहाची सुटका करण्यात आली असून ३५ समुद्र चाच्यांना ताब्यात घेतलं आहे. आएनएस कोलकाता युद्धनौकेवरून ४० तासांची मोहीम नौदलाने राबवली होती, त्यात नौदलला मोठं यश आलं आहे. या मोहिमेत जहाजावरील १७ जणांचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉गेल्या तीन महिन्यांपासून एक मालवाहतूक जहाज या लुटारूंच्या ताब्यात होतं. दीर्घकाळ चाललेल्या या मोहिमेत समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पडलं. आयएनएस युद्धनौका मुंबईला पोहोचली असून ताब्यात घेतलेल्या चाच्यांविरोधात आयपीसी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. एमव्ही रुएनचं गेल्या १४ डिसेंबर रोजी सोमालीयाच्या चाच्यांनी अपहरण केलं होतं. खोल समुद्रात होणारी टुटमार रोखण्यासाठी हे जहाज निघालं होतं.*

*👉🅾️🅾️👉आयएनएस कोलकाताने लॉन्च केलेल्या ड्रोनद्वारे एमव्ही रुएनवर सशस्त्र समुद्री चाच्यांच्या उपस्थितीचा सुगावा लागला होता. यावेळी चाच्यांनी ड्रोन खाली पाडलं होतं भारतीय नौदलाच्या जहाजावर गोळीबार केला. INS कोलकाता ने जहाजाची सुकाणू प्रणाली आणि नेव्हिगेशनल एड्स निष्क्रीय केली, ज्यामुळे समुद्री चाच्यांना जहाज थांबवण्यास भाग पडलं. भारतीय समुद्र किनाऱ्यापासून २६०० सागरी मैलावर या जहाजाला रोखण्यात आलं. या जहाजावरून दारूगोळा आणि शस्त्रे आणि बंदी असलेलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!