img 20240312 wa0044
मगर ॲक्सिडेंट व डोळ्यांचे हॉस्पिटल कृष्णदृष्टी ॲडव्हान्स आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापनदिन निमित्ताने मधुमेही व रक्तदाब रुग्णांसाठी डोळ्याच्या मागील पडद्याचा (रेटिना) मोफत स्कॅन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये 107 रुग्णांची मोफत करण्यात आली असल्याची माहिती डॉ.गीता मगर यांनी दिली.

यावेळी डॉ. अपर्णा काटे आणि डॉ. समीर मगर, डॉ.जयश्री गटकुळ, महिला पोलीस कर्मचारी आरा जाधव व कल्याणी खंडागळे उपस्थित होत्या.

डॉ. राम अरणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या शिबीरात अरविंद नेत्रालय, मदुराई येथील अनुभवी दृष्टीपटल(रेटिना) तज्ञ डॉ. पूजा वाबळे – पवार यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली.

कार्यक्रमाची प्रास्तावना आराध्या मगर यांनी केली तर उपस्थितांचे आभार डॉ. समीर मगर यांनी मानले.

यावेळी अनुराधा गारटकर, उमा इंगोले, हेमा माळुंजकर, जयश्री खबाले, रतन पाडुळे, निर्मला जाधव उज्वला गायकवाड,सुनीता वाघ, रेखा जोशी, रहना शेख,शारदा नागपुरे, कांचन बानकर, कल्पना भोर, अर्चना शिंदे, सुनंदा आरगडे उपस्थित होत्या.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!