
चेतना फाउंडेशनच्या चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे सोमवार ( ता.19) रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. शिवजयंतीच्या निमित्ताने स्कूलमध्ये भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांविषयी आपले विचार अतिशय छान रित्या व्यक्त केले. सोमनाथ माने सरांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची कथा सांगून मार्गदर्शन केले. तसेच पारेकर मॅडम ,खबाले सर, फौजीया मॅडम व प्रांजली मॅडम नेही आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले. शिवजयंतीचे औचित्य साधून कॉलेजच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष श्री उदय देशपांडे, सचिव विलास भोसले सर ,खजिनदार सोमनाथ माने सर , चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चा इन्चार्ज प्रिन्सिपल प्रियंका पारेकर मॅडम व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे इन्चार्ज प्रिन्सिपल कैलास खबाले सर ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांजली सुतार यांनी केले .सूत्रसंचालन फौजिया पठाण यांनी केले व आभार प्रदर्शन हर्षदा चौधरी यांनी केले.