img 20240211 wa0027
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेमध्ये भाषण केलं. 17व्या लोकसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर 2024 च्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत सरकारने मागच्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामाचा पाढा वाचला.तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या सत्रात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करेल.*

*👉🛑🛑👉पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे*

*🔺🔺देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म कमी वेळा होतो, 17वी लोकसभा आज याचा अनुभव घेत आहे*
*🔺🔺देशाची 17वी लोकसभा नक्कीच आशिर्वाद देईल*
*🔺🔺संकटाच्या काळात सगळ्या खासदारांनी त्यांचं वेतन 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.*
*🔺🔺खासदारांच्या कॅन्टिनमध्ये प्रत्येक नागरिकाला एकाच दरात पदार्थ द्यायचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला.*
*🔺🔺संसद भवन झालं पाहिजे याबाबत चर्चा झाल्या, पण निर्णय होत नव्हता पण तुमच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि देशाला नवीन संसदभवन मिळालं*
*🔺🔺पाच वर्ष खूपच आव्हानात्मक होती.तर देशाच्या सेवेसाठी आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले तसेच संकट काळातही काम थांबलं नाही.सगळ्यात मोठं संकट मानवजातीने पाहिलं*
*🔺🔺अध्यक्षांनी सर्वच स्थितीचा सामना केला.या कार्यकाळात G20 चं यजमानपद मिळालं*
*🔺🔺प्रत्येक राज्याने चांगलं आयोजन केलं*
*🔺🔺भारताला जगात सन्मान मिळाला.तर संसदेच्या ग्रंथालयाचे दरवाजे सर्वसामान्यांना खुले केले.17 व्या लोकसभेने अनेक विक्रम नोंदवले.*
*🔺🔺स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला.याच संसदेतून कलम 370 हटवलं काश्मीरी जनतेला न्याय मिळाला.तीन तलाक मुक्तीचा निर्णय घेतला.*
*🔺🔺दहशतवाद मुक्त भारताचं स्वप्न पूर्ण होणार*
*🔺🔺नारीशक्ती वंदन अधिनियम परिणाम करेल*
*🔺🔺पुढच्या 25 वर्षात भारताला विकसित भारत बनवणार*
*🔺🔺5 वर्षात तरुणांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले*
*🔺🔺भारत जगासाठी संशोधनाचं केंद्र बनेल.तर अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे बदल झाले*
*🔺🔺पेपर लीक संदर्भात कठोर कायदा केला*
*🔺🔺आता निवडणुका दूर नाहीत भारत आणि लोकशाहीची यात्रा अनंत काळापर्यंत*
*🔺🔺निवडणुकांमुळे काहींमध्ये भीती निर्माण झाली आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!