मोदींनी स्वतःबद्दल लिहिले

माझे ८ जणांचे कुटुंब राहत होते – ती खोली लहान होती, पण आमच्यासाठी ती पुरेशी होती.

आमचा दिवस लवकर पहाटे ५ वाजता सुरू होत असे जेव्हा माझी आई नवजात आणि लहान मुलांना, पारंपारिक पणे अंगाला लावायला ( massage) आणि उपचार करायला जात असे.

रात्रभर मी आणि माझा भाऊ तिच्यासाठी ‘चुल’ गरम ठेवण्यासाठी आळीपाळीने जागत असू.

तिच्याकडे कसलच औपचारीक शिक्षण नव्हतं आणि ते घेण्याचे भाग्य नव्हते, परंतु देव दयाळू होता आणि आजार बरे करण्याचा एक विशेष हातखंडा तिच्याकडे होता.

इतर आया दररोज सकाळी आमच्या घराबाहेर रांगा लावत असत कारण ती तिच्या उपचारांसाठी ओळखली जात असे.

मग, मी रेल्वे स्टेशनवर माझ्या वडिलांचे चहाचे दुकान उघडे, स्वच्छ करे आणि मग शाळेत जात असे.

शाळा संपताच मी धावत त्यांच्या मदतीला जात असे, परंतु ज्याची मी खरोखर वाट बघत असे ती देशभरातील लोकांना भेटायची. मी त्यांना चहा देत असे आणि त्यांच्या कथा ऐकत असे – अश्या प्रकारे मी हिंदी बोलायला शिकलो.

मी काही व्यापारी लोकांना ‘बंबई’ बद्दल बोलताना ऐकायचो आणि विचार करायचो की, “मला कधी हे स्वप्नांचे शहर पाहायला मिळेल का?”

मला नेहमीच कुतूहल असायचे – मी वाचनालयात जात असे आणि हाती मिळेळ ते सर्व वाचून काढत असे.

मी आरएसएसच्या पहिल्या बैठकीला गेलो होतो तेव्हा मी ८ वर्षांचा होतो आणि ९ वर्षाचा असताना इतरांच्या जीवनासाठी चांगल्या प्रयत्नांचा एक भाग बनायचे ठरवले. तेव्हा मी गुजरातमधील काही भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी माझ्या मित्रांसह एक खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. मला आणखी खूप काही करायचे होते, परंतु मला माहित होते की आमच्याकडे त्यासाठी लागणारे पैसे आणि इतर सोयी नाहीत.

तरीही, त्या वयातही, माझा असा ठाम विश्वास होता की देवाने आपल्या सर्वांना एकसारखे बनवले आहे.

मी कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो ह्याने काही फरक पडत नाही, मी आणखी काहीतरी नक्की करू शकतो. म्हणून जेव्हा जेव्हा आपण मला विचारता, माझे संघर्ष काय होते, तेव्हा मी सांगेन की काहीच नव्हते. मी खूप श्रीमंती नाही पाहिली, मला ऐशो आराम माहित नव्हता आणि ‘चांगले’ दिवस दिसले नाहीत, तरीही माझ्या छोट्याश्या जगामध्ये… मी आनंदी होतो.

जर मार्ग कधी कठीण असेल तर मी माझा मार्ग तयार केला. मला तल्लख आणि निटनेटकं दिसण्याची खूप गरज होती.

म्हणून, जरी आम्हाला इस्त्री परवडत नसली, तरी मी थोडा कोळसा गरम करत असे, जुन्या लोट्या मधे ते भरत असे, त्याभोवती कापड गुंडाळत असे आणि माझे कपडे इस्त्री करत असे – परिणाम एकच होणार, मग तक्रार कशासाठी?

मी आज जो काही आहे त्या प्रत्येक गोष्टीची ही सुरुवात होती आणि मला त्यावेळी ह्याची कत्पना नव्हती.

जर आपण आठ वर्षांच्या नरेंद्र मोदीला, चाय विकत फिरत असताना आणि आपल्या वडिलांचा चहा स्टॉल साफ करीत असताना विचारले असते की तू पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्याची हिम्मत करतोस का, त्याचे उत्तर नाही असेच होते. कदापी नाही. याबद्दल विचार करणे सुध्दा खूप दूरची गोष्ट होती.

मोठा होत असताना मला खूप कुतूहल होते पण विचारांमधे स्पष्टता फारच कमी होती. मी सैन्याच्या माणसांना त्यांच्या गणवेशात पहात असे आणि मला वाटायचे की देशसेवेचा हा एकमेव मार्ग आहे.

पण जेव्हा रेल्वे स्थानकावरील, माझी संत आणि साधू यांच्याशी झालेली संभाषणे जसजशी अधिक वाढत गेली, तेव्हा मला समजले की हे जग (अध्यात्म ) सुध्दा शोधण्यासारखे आहे.

मी अनिर्णीत, दिशाहीन आणि अस्पष्ट असं आयुष्य जगत होतो – मला माहित नव्हते मला कुठे जायचे आहे, मला काय करायचे आहे आणि मला ते का करायचे आहे. पण मला एवढेच माहित होते की, मला काहीतरी करण्याची इच्छा आहे.

म्हणून मी स्वत: परमेश्वरासमोर शरण गेलो आणि वयाच्या १७ व्या वर्षी हिमालयात रवाना झालो.

मी निघण्यापूर्वी आईने मला एक गोड शिदोरी दिली आणि माझ्या प्रवासाला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या कपाळावर टिळक लावले आणि मी माझ्या पालकांचा निरोप घेतला.

नशीबाने देवाने जिथे मला नेले तेथे मी गेलो – हा माझ्या आयुष्यातील अनिश्चीत काळ होता परंतु तरीही, मला बरीच उत्तरे ह्या काळात सापडली, मिळाली.
मी जग समजून घेण्याचा, व स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मी दूर-दूर प्रवास केला, रामकृष्ण मिशन मधे वेळ घालवला, साधू-संतांना भेटलो, त्यांच्याबरोबर राहिलो आणि पुढे स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला.

मी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरलो – माझ्या डोक्यावर छप्पर नव्हतं, परंतु तरीही घर नाही असं कधी वाटले नाही.

मी सकाळी ब्रम्हमुहुर्तावर ३ ते ३.४५., दरम्यान उठून हिमालयाच्या अतिथंड पाण्याने आंघोळ करीत असे, परंतु तरीही मला आतून उब जाणवत असे. धबधब्याच्या साध्या आवाजातही शांतता, ऐक्य आणि ध्यान मिळू शकते हे मला तेव्हा कळले.

मी ज्या साधुं बरोबर राहत असे त्यांनी मला स्वतःला विश्वाच्या तालाशी जुळवून कसे घ्यायचे ते शिकवले.

मग मी ते केले – मी स्वतःला संरेखित केले आणि त्याने झालेले साक्षात्कार आजपर्यंत मला मदत करणारे अनुभव देत आहेत. मला समजले की आपण सर्वजण आपल्या विचारांनी आणि मर्यादेने अडकलो आहोत. जेव्हा आपण शरण जाल आणि विशालतेसमोर उभे रहाल – तेव्हा आपणाला समजेल की आपण मोठ्या विश्वाचा एक छोटासा भाग आहात. जेव्हा आपण हे समजता, तेव्हा आपल्यात असलेले काही गर्विष्ठपणाचे अवशेष वितळतात आणि मग खरोखरच आयुष्य सुरू होते.

जेव्हा हे सर्व बदलले. दोन वर्षानंतर, मी मार्गदर्शनाची स्पष्टता आणि मार्गदर्शक बल घेऊन घरी परतलो.

हिमालयातून परत आल्यानंतर मला माहित होते की माझे आयुष्य असेच इतरांच्या सेवेत घालवावे. परत येण्याच्या थोड्या अवधीतच मी अहमदाबादला रवाना झालो. मोठ्या शहरात राहण्याचा माझा पहिला अनुभव होता – जीवनाची गती इथे खूप वेगळी होती. मी माझ्या काकांना त्याच्या कॅन्टीन मधे, मधूनमधून मदत करुन वेळ घालवत असे.

अखेरीस, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ प्रचारक बनलो.

तेथे मला विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्याची आणि विस्तृत काम करण्याची संधी मिळाली. आम्ही सर्वजण आरएसएस कार्यालय स्वच्छ करण्याचे, सहकार्यांसाठी चहा आणि खाद्यपदार्थ बनवण्याचे आणि भांडी घासायचे काम आळीपाळीने करत असू.

आयुष्य कठोर आणि व्यस्त होते. परंतु माझ्या सर्व कर्तव्यांमधे मी हिमालयातून घेतले ते माझे शिक्षणाचे धडे विसरायचे नाहीत असा दृढनिश्चय केला होता.

जीवनाच्या या नवीन टप्प्या मधे मी तेथे मिळवलेल्या शांती जराही ढळू द्यायची नाही हे सुनिश्चित करण्यासाठी, मी दरवर्षी थोडा वेळ काढून आत्मनिरीक्षण करण्याचे ठरविले. संतुलित जीवन जगण्याचा हा माझा मार्ग होता.

हे बर्‍याच लोकांना माहित नाही, पण मी दिवाळीच्या ५ दिवसां साठी दूर जात असे. जंगलात कुठेतरी – फक्त स्वच्छ पाणी आणि लोक नाही अशा जागी. मी त्या ५ दिवसांकरिता पुरेसे अन्न घेऊन जात असे.

तेव्हा कोणतेही रेडिओ किंवा वर्तमानपत्र नव्हते आणि त्या काळात, टीव्ही किंवा इंटरनेट तर नव्हतेच. मी आत्मपरीक्षण करे- आणि ह्या एकट्या घालवलेल्या वेळाने मला दिलेली शक्ती अद्याप मला जीवन आणि त्याचे विविध अनुभव हाताळण्यास मदत करते.

*लोक मला नेहमी विचारत असत की, ‘तू कोणाला भेटायला जात आहेस?’ आणि मी म्हणे, ‘ मै मुझसे मिलने जा रहा हुँ.’* *(मी स्वतःला भेटायला जातो आहे!)*

म्हणूनच, मी नेहमीच प्रत्येकाला, विशेषत: माझ्या तरुण मित्रांना उद्युक्त करतो की, तुमच्या वेगवान आयुष्यात आणि व्यस्त वेळापत्रकात तुम्ही थोडा वेळ काढा… विचार करा आणि आत्मपरीक्षण करा. हे आपली आयुष्या बद्यलची समज बदलेल – आपण आपल्या अंतःकरणाला अधिक चांगले समजून घ्याल.

आपण खर्‍या अर्थाने जगणे सुरू कराल. हे आपला आत्मविश्वास वाढवेल आणि इतर लोकं जे म्हणतात त्याद्वारे आपण विचलीत न होता यशस्वी व्हाल. या सर्व गोष्टी भविष्यात आपल्याला मदत करतील.

म्हणून मी फक्त प्रत्येकाला हे सांगतो की, आपण लक्षात ठेवले पाहिजे, की आपण विशेष आहात आणि आपल्याला प्रकाशासाठी बाहेर पाहण्याची गरज नाही… तो तुमच्यात आधीच आहे..

खरच,वाचाल तर वाचाल.
त्रिवार वंदन.
Forwarded

11th January 2023

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!