मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दीर्घकाळापासून सुरु असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला यश आलेय. रात्री अकराच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ अधिकारी जरांगेच्या शिष्टाईसाठी आलं होतं. तब्बल अडीच ते तीन तास चर्चा करत सरकारने दिलेला अध्यादेश जरांगे पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते. त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच आझाद मैदानात जाणार नसल्याच त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असं मोठं मैदान बघून एक तारीख जाहीर करून आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

यानंतर संपूर्ण महाराष्ट्रराज्यात या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत होत आहे. जवळपास साठ वर्षाहून अधिक काळ सुरु असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सत्त्यात उतरला असल्याने मराठा समाज बांधव फटाके फोडून याचे स्वागत करीत आहेत.एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!