मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन

..महाराष्ट्राला सार्थ अभिमान!

मुंबई, दि. २६:  – देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्यांतील सहा मान्यवरांना पद्मभूषण आणि सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये होरमुसजी एन. कामा (साहित्य-शिक्षण-पत्रकारिता), आश्वीन मेहता (वैद्यकीय), राम नाईक (सार्वजनिक क्षेत्र), राजदत्त तथा दत्तात्रय मायाळू (कला), प्यारेलाल शर्मा (कला), कुंदन व्यास (साहित्य-शिक्षण) तसेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये उदय देशपांडे (क्रीडा मल्लखांब प्रशिक्षण), मनोहर डोळे व चंद्रशेखर मेश्राम (वैद्यकीय सेवा), जहीर काझी (साहित्य व शिक्षण),  श्रीमती कल्पना मोरपारिया (उद्योग व व्यापार), शंकर बाबा पापळकर (सामाजिक कार्य) यांचा समावेश आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

या मान्यवर पुरस्कारार्थींचे सार्वजनिक कार्य, सामाजिक आणि वैद्यकीय, कला, क्रीडा, साहित्य- शिक्षण, उद्योग व व्यापार, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या सर्वांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यात योगदान दिले आहे. या सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!