बालपण आठवून भर कार्यक्रमात पीएम मोदी भाऊक…
सोलापूर येथे पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावरील भाषणादरम्यान भावूक झाले. शुक्रवारी त्यांनी राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान बालपणीचा उल्लेख येताच त्यांनी काही क्षणांसाठी आपले बोलणे अर्धवटच थांबवले. पंतप्रधान आवास योजनेबाबत ते म्हणाले की, मलाही लहानपणी अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती. पीएम मोदी म्हणाले की, ‘सोलापूरच्या हजारो गरीब आणि हजारो मजुरांसाठी आम्ही घेतलेला संकल्प आज पूर्ण होत आहे, याचा मला आनंद आहे. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले आहे. आणि मी जाऊन पाहिलं की मलाही लहानपणी अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती.असं म्हणत पंतप्रधान मोदींनी अचानक भाषण काही काळ थांबवलं. यानंतर ते भावूकपणे म्हणाले,*

*👉🅾️🅾️👉’जेव्हा मी या गोष्टी पाहतो तेव्हा मला खूप समाधान वाटते, हजारो कुटुंबांची स्वप्ने सत्यात उतरतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी संपत्ती असते. मी या प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी आलो तेव्हा तुमच्या घराच्या चाव्या देण्यासाठी मी स्वतः येईन, अशी हमी तुम्हाला दिली होती. पीएम मोदी म्हणाले, ‘दोन प्रकारचे विचार आहेत.लोकांना राजकीय विधान करण्यासाठी भडकवत रहा. आमचा मार्ग आहे… कामगारांचा सन्मान, स्वावलंबी कामगार, गरिबांचे कल्याण. यावेळी पंतप्रधानांनी जुन्या सरकारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘बर्‍याच काळापासून आपल्या देशात गरिबी हटावचा नारा दिला जात होता, पण गरिबी हटली नाही. गरिबांच्या नावावर योजना केल्या, पण त्याचा लाभ गरिबांना मिळाला नाही. मध्यस्थ त्यांच्या हक्काचे पैसे लुटायचे. आधीच्या सरकारांचे धोरण, हेतू आणि निष्ठा या गोत्यात होती.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!