• img 20231215 wa0042

    नवी दिल्ली:-संसदेतील सुरक्षा विषयक त्रुटींचे संतप्त पडसाद गुरुवारी लोकसभेत उमटले. या मुद्यावरून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४ सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्यंत निलंबित करण्यात आले. यात काँग्रेसच्या ९, माकप आणि द्रमुकच्या प्रत्येकी दोन तर भाकपच्या एका सदस्याचा समावेश आहे. राज्यसभेतूनही तृणमूल काँगे्रसचे सदस्य डेरेक ओ ब्रायन यांना निलंबित करण्यात आले.*

*👉🅾️🅾️👉बुधवारी लोकसभेत शून्य तासाचे कामकाज सुरू असताना दोन युवकांनी प्रेक्षक दीर्घेतून लोकसभेत उड्या मारल्या तसेच घोषणा देत स्मोकगनमधून पिवळ्या रंगाचा धूर काढला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. बुधवारी लोकसभेत घडलेली घटना गंभीर स्वरूपाची सुरक्षा विषयक त्रुटी आहे, असा आरोप करीत, गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी काँग्रेस आणि अन्य विरोधी सदस्यांची मागणी होती.*

*👉🔴🔴👉विरोधी सदस्यांच्या हातात घोषणांचे फलक होते. वेलमध्ये येत त्यांची घोषणाबाजी सुरू होती. सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न सभापती ओम बिर्ला करीत होते. मात्र, विरोधी सदस्य विशेषत: काँग्रेसचे सदस्य अतिशय आक्रमक भूमिकेत होते. गोंधळ शांत होत नसल्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू होताच गोंधळ सुरू झाला. हातात घोषणांचे फलक घेत सदस्य वेलमध्ये उतरले. अमित शाह यांच्या निवेदनाची तसेच राजीनाम्याची मागणी सदस्य करीत होते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाचा अपमान केला, असा आरोप केला. प्रेक्षक दीर्घेतून सभागृहात उडी मारण्याच्या, घोषणा देण्याच्या, कागद भिरकावण्याच्या घटना याआधीही अनेक वेळा घडल्या. बुधवारच्या घटनेची मी जुन्या घटनेशी तुलना करीत नाही, संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक ही गंभीर स्वरूपाची आहे. यातून आपल्याला एकत्र येत मार्ग काढायचा आहे. या घटनेचे राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.*

*👉🅾️🅾️👉टी. एन. प्रतापन, हिबी हिडेन, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस आणि ज्योतिमणी या काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही त्यांनी मांडला, तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. सुरू असलेल्या गोंधळातच पीठासीन सभापती मेहताब यांनी संसदीय कामकाज मंत्री जोशी यांना बोलण्याची परवानगी दिली. विरोधकांच्या घोषणाबाजीत जोशी यांनी व्ही. श्रीकांतन, पी. आर. नटराजन, मणिक्कम टगौर, कनिमोझी, मोहम्मद जावेद, बेनी बेहानन, एस.आर. प्रतिबान, के. सुब्रमण्यम आणि एस. व्यंकटेशन अशा एकूण नऊ सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला, तो आवाजी मतदानाने पारित करण्यात आला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.*

*👉🅾️🅾️👉सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची :-बिर्ला*

*संसद भवनाची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे, असे नमूद करत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. बुधवारी जी घटना घडली, त्यामुळे आम्ही सगळेच चिंतीत आहो. सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची आहे, सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही चुकीचा पायंडा पाडू नका. आधीही अशा घटना घडल्या आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये, म्हणून आपण पुन्हा चर्चा करू, असे ओम बिर्ला म्हणाले.*

*👉🟥🟥👉अराजकता निर्माण करणाऱ्यांना पास देऊ नका :-*

*राजनाथसिंह लोकसभेत बुधवारी घडलेल्या घटनेमुळे आपण सावध झालो पाहिजे, अराजकता निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आणि शक्तींना संसद भवनात प्रवेशाचे पास मिळणार नाही, याची काळजी सत्ता पक्ष आणि विरोधी सदस्यांनी घेतली पाहिजे,असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केले.*

*👉🛑🛑👉खासदार हनुमान बेनिवाल यांनी स्पीकरच्या व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला*

*गुरुवारी लोकसभेत संसदेच्या सुरक्षेतील कुचराईच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, राजस्थानमधील आरएलपी पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान स्पीकरच्या व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला.*

*👉🅾️🅾️👉विरोधी पक्षाचे खासदार घोषणाबाजी करत वेलमध्ये आले. अमित शहा यांनी सभागृहात येऊन या विषयावर विधान करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!