img 20231210 wa0023
शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर- पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर- पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदरची नियुक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुर शेख यांनी केली असुन, नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय पत्रकार संघाचे लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष अॅड. कैलास पठारे, उपाध्यक्ष,अॅड. पांडूरंग ढोरे पाटील, भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ, लिगल विंगचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. समीर बेलदरे पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख, सचिव काशिनाथ पिंगळे इ. मान्यवर उपस्थित होते.

इंदापूर तालुक्यात १९९८ साली पत्रकारीतेला धनंजय कळमकर-पाटील यांची सुरुवात पत्रकार क्षेत्रातील दमदार लेखणी,व कवि रामदास देवकर दैनिक सामना, पुढारी चे प्रतिनिधी यांच्याबरोबर झाली‌. त्यानंतर सलग पाच ते सात वर्षे वेगवेगळे पेपरला काम करून अनुभव मिळवला, इंदापूर तालुक्याचे सुपुत्र शिरूर तालुक्यातील म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. नागनाथ शिंगाडे यांचे सा.नागरिक समता अनेक दिवस चालवला. त्यामध्ये इंदापूर तालुका दर्शन हे पुस्तक ही काढले, त्यावर अनेक जणांनी तालुक्याची माहिती घेऊन पीएचडी मिळवली आहे. अनेक पेपरला इंदापूर प्रतिनिधी म्हणून काम केले नंतर , स्वतःचे शिवसृष्टी नावाची साप्ताहिक सुरू केले नंतर स्वराज्य निर्माता म्हणून एक मासिक चालू केले.

लक्ष्मी वैभव चे संपादक कै. विलासराव गाढवे,व शिवसृष्टी चे संपादक धनंजय कळमकर जय वीरूची जोडी यांनी आपल्या धारदार लेखणीतून इंदापूर तालुक्यातील तळागाळातील गरजू व्यक्तींच्या बातम्या छापून अनेकांना सुता सारखे सरळ ही केले. तळमळीने पत्रकारिता सुरू आहे म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने इंदापूर तालुका सचिव म्हणून धनंजय कळमकर यांची निवड केली यामध्ये हाजी एम.डी. शेख राष्ट्रीय अध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष संदेश शहा, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शौकत भाई तांबोळी व मार्गदर्शक म्हणून कै. विलासराव गाढवे तर खंबीर साथ कैलास पवार सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार महादेव चव्हाण सर यांची मोलाची साथ मिळाली.

त्यानंतर तालुक्यातच इतरांनाही संधी मिळावी म्हणून भारतीय पत्रकार संघ या संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय कळमकर-पाटील यांची निवड झाली या निवडीनंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा येतोच असं सन्मान कार्याचा सन्मान केला या वेळी बोलताना धनंजय कळमकर पाटील म्हणाले की, मला, सामाजिक कार्यकर्ते व घटनात आंदोलनाचे प्रणेते लक्ष्मणराव तात्या गुणवरे यांनी सुरुवातीचा पुरस्कार देऊन माझ्या बातमीचा गौरव केला. त्यानंतर तेच पृथ्वी ग्रुपच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. नानासाहेब खरात व अनिताताई खरात यांच्या हस्ते चेतन फाउंडेशन च्या वतीने काकासाहेब मांढरे यांनी निर्भीड पत्रकार पुरस्कार दिला. बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल कै.विलासराव गाढवे यांनी निर्भीड संपादक म्हणून पुरस्काराने गौरविले.

महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने पांडुरंग शिंदे यांनी उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार दिला. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला तो पुरस्कार श्रीमती पद्माताई भोसले यांच्या हस्ते देण्यात आला,या वेळी बोलताना धनंजय कळमकर पाटील म्हणाले की,

खींचो न कमानों को
न तलवार निकालो !
जब तोप मुक़ाबिल हो
तो अख़बार निकालो!!
पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्ट्राचार याविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरचा बरोबर घायाळ होईल …जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात, त्यांनी पत्रकारिता न करता वडापावचा गाडा टाकावा,असे माझे स्पष्ट मत आहे.
पत्रकारिता जीवनाची सेवा आहे.ढोंग, विषमता आणि अन्याय ह्यांच्याविरुद्ध उपसलेली ती तलवार आहे. सत्य, समता, आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनेची ती पूजा आहे.,या वेळी माझे जिवलग मित्र कैलास भाऊ पवार हमीदभाई आतार महादेव चव्हाण सर , उपस्थित होते.
पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार आहे. पत्रकाराच्या लेखणीला तलवारीची धार नसेल, तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने ‘पत्रकार’ होण्याऐवजी ‘पात्रकार’ व्हावे! असं आचार्य अत्रे यांनी म्हटलंय .पण आजकाल अर्ध्या हळकुंडात न्हालेल्या ‘पत्रक’कारांनी पत्रकारितेचा धंदा मांडलाय.पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू आहे.

जो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहितो त्याविरुद्ध षडयंत्र केलं जातं. दुकानदारी करणारे एकत्र येतात आणि सत्यवादी पत्रकारविरुद्ध मोहीम राबवली जाते, दोन नंबर धंदेवाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात.अश्या लोकांचे जागोजागी पिक वाढले आहे.त्यात बिनकामाचे तण वाढले आहे, ज्यास चार ओळीची बातमी नीट लिहिता येत नाही, ते पत्रकार म्हणून मिरवत आहेत.
समाजाने अश्या लोकांना खड्याप्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहितात, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे .असे मत धनंजय कळमकर- पाटील यांनी व्यक्त केले, आम्ही ख-या पत्रकारांच्या पाठीशी खंबीर उभे राहू असे हे बोलताना सांगितले.

भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी दुसऱ्या छायाचित्रात इंदापूर येथील प्रसिद्ध उद्योजक कापड व्यापारी मुकुंदशेठ शहा, भरतशेठ शहा सत्कार करताना व इतर

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!