02e4af48de7d45b7b1bf8fd8ee61374e(1)
कामधेनु सेवा परीवार शाखा भातागळी यांचे तर्फे “भाऊबीज “कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आजी माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय तसेच अकाली वैधव्य आलेल्या विधवा भगिनी, निराधार व अनाथ मुले यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यामध्ये विधवा भगिनीनी उपस्थितांना भाऊ मानून ओवाळणी केली. या कार्यक्रमाचे उदघाटन वीरपत्नी बेबीताई शहाजी नरगवडे व वीरपत्नी गंगाताई दत्तात्रय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डाॅक्टर लक्ष्मणजी आसबे संस्थापक अध्यक्ष कामधेनु सेवा परीवार बावडा ता इंदापूर, श्रीमान माधवरावजी पाटील माजी सरपंच उदतपूर, श्रीमान राजूभैय्या पाटील संचालक द्वारकादास शामकुमार ग्रुप लातूर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.गुरूवर्य महेश महाराज माकणी,तसेच कामधेनु सेवा परीवार पुरस्कार आदरणीय रमाकांत जोशी साहेब स्पर्श रूग्णालय सास्तूर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना डाॅक्टर आसबे यांनी जवानांच्या पत्नी या कधीच विधवा होत नाहीत, कारण देशाच्या सीमेवर शहीद झालेला जवान हा अमर झालेला असतो तसेच यापुढे पती निधनानंतर या माता भगिनीचे सौभाग्य अलंकार उतरू नयेत,कारण सौभाग्य अलंकार हे तिचे कवचकुंडल आहेत असे सांगितले. तसेच वीरमाता व वीरपत्नीला समाज कार्यात अग्राहाचे स्थान देऊन त्यांचा सन्मान वाढवावा असे आवाहन केले. श्री माधवराव पाटील यांनी देखील समाजातील अनिष्ठ प्रथा बंद करून व्यसनाधीन पिढी बाबत उपस्थितांचे प्रबोधन केले. तसेच भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त केला. श्री राजूभैय्या यांनी आपल्या उत्पनातील कांही हिस्सा सैनिक व विधवा भगिनी यांच्यासाठी उपयोगात आणावा आणि या कार्याची सुरवात मी करीत असल्याचे याच कार्यक्रमात जाहीर केले. श्रीमान रमाकांत जोशी सर यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांनी ॠण व्यक्त करून आपल्या पुरस्काराने मला अधिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात ह.भ.प महेश महाराज यांनी चार हजार बहिणींचा भाऊ डाॅक्टर लक्ष्मणजी आसबे यांच्या कार्याचे व जोशी सरांच्या कार्याचे कौतुक करून मी देखील पुढील वर्षापासून “भाऊबीज “कार्यक्रमात सहभागी असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने परीसरातील महिला भगिनी व सैनिक कुटूंबियासह हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयसिंह जगताप यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिष जगताप, दत्तात्रय वाघमारे, रविकिरण जगताप, दत्तात्रय पवार, राम जगताप, आप्पासाहेब कारभारी, बालाजी यादव, बळवंत जगताप, दिलीप कुलकर्णी, दाजी आनंदगावकर, पंडित मस्के, प्रल्हाद उर्फ भाऊसाहेब जगताप, अनिल कदम, दगडू कदम, बाळू वाले, काटकर मंडळ, सरस्वती महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!