वर्ल्डकप फायनलसाठी ६ विशेष एक्स्प्रेस सोडण्याचा मध्य व पश्चिम रेल्वेचा निर्णय*

*मुंबई:-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात यंदाच्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये रंगणार आहे. यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळणार असल्याने रेल्वे प्रशासनाने सहा विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या वांद्रे-अहमदाबादसह मुंबई सेंट्रल-अहमदाबाददरम्यान विशेष एक्स्प्रेस धावणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण आज, शनिवारपासून सर्व आरक्षण केंद्र आणि ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर खुले होणार आहे.*

*👉🅾️🅾️👉गाडी क्रमांक ०११५३/४ विशेष सीएसएमटी ते अहमदाबाद*

– (०११५३) सीएसएमटीहून शनिवारी रात्री १०.३० वाजता रवाना होईल आणि अहमदाबादला रविवारी पहाटे ६.४०ला पोहोचेल.

– (०११५४) अहमदाबादहून रविवारी मध्यरात्री १.४५ वाजता रवाना होईल आणि सोमवारी सकाळी १०.३५ला मुंबईत पोहोचेल.

– गाडीची संरचना :११ तृतीय एसी डबे, ३ द्वितीय एसी, १ प्रथम एसी, १ द्वितीय श्रेणी आणि १ पॉवर डबा

*👉🔴🔴👉गाडी क्रमांक ०९००१/२ विशेष वांद्रे टर्मिनस ते अहमदाबाद*

– (०९००१) वांद्रे टर्मिनसहून शनिवारी रात्री ११.३०ला रवाना होऊन अहमदाबादला रविवारी पहाटे ७.२० ला पोहोचेल.

– (०९००२) अहमदाबादहून सोमवारी पहाटे ४ला रवाना होईल आणि त्याचदिवशी दुपारी १२.१०ला वांद्रे टर्मिनसमध्ये पोहोचेल.

*👉🅾️🅾️👉गाडी क्रमांक ०९०४९/५० विशेष मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद*

– (०९०४९) मुंबई सेंट्रलहून शनिवारी रात्री ११.५५ ला रवाना होऊन अहमदाबादला रविवारी ८.४५ ला पोहोचेल.

– (०९०५०) अहमदाबादहून सोमवारी पहाटे ६.२० ला रवाना होईल आणि त्याचदिवशी दुपारी २.१० ला मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!