शेतकऱ्यांची दिवाळी गोड;*

*👉🟥🟥👉पीएम किसानचा १५ वा हप्ता खात्यात जमा*

*नवी दिल्ली :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवार दि.१५ पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता जारी करण्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी झारखंडमधील खुंटी येथील बिरसा कॉलेजमध्ये उपस्थित होते.त्यांनी ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली.*

 

*👉🟥🟥👉प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यावर दरवर्षी ६ हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. केंद्र सरकार दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करत असते.*

 

पंतप्रधान मोदी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मोदी यांनी सकाळी ११:३० वाजता १५ वा हप्ता खुंटी येथूनच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना १४ हप्ते मिळाले आहेत. हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पाठवले गेले.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!