Fri. Mar 1st, 2024

चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे नवरात्रीचा अनोखा जल्लोष.

चेतना फाउंडेशन संचलित ,
चेतना इंटरनॅशनल स्कूल ,सरडेवाडी

🌼चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे नवरात्रीचा अनोखा जल्लोष.

चेतना फाउंडेशनच्या इंटरनॅशनल स्कूल मध्ये सोमवार (ता.23) रोजी नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे, सचिव विलास भोसले सर व खजिनदार सोमनाथ माने सर उपस्थित राहिले. स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पालकांनी विशेष उपस्थिती दर्शवली. फक्त विद्यार्थ्यांनीच नव्हे तर शिक्षकांनी तसेच सर्व पालकांनी दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
नवरात्रीचे औचित्य साधून स्कूलमध्ये महिलांसाठी रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये महिलांनी आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला. चेतना फाउंडेशनच्या सदस्या प्राजक्ता भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धेचे विजेते ठरवण्यात आले . तसेच प्राजक्ता मॅडम यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले व भविष्यातही अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रोत्साहन दिले .चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष श्री उदय देशपांडे यांच्या मातोश्री अपर्णा देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार सोमनाथ माने सर यांनी केले व प्रांजली मॅडमच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

Related Post

error: Content is protected !!