भारताला पहिले सुवर्ण
नेमबाज रुद्रांक्ष, दिव्यांक्ष,ऐश्वर्यसह वर्ल्ड रेकॉर्ड

img 20230926 wa0003
हांगझोउ (चीन) :-भारतीय खेळाडूंनी १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ३ रौप्य व २ कांस्य अशी ५ पदकांची कमाई करून पदकतालिकेत सातवे स्थान पटकावले.नौकानयन स्पर्धेत अनपेक्षित दोन रौप्य व एक कांस्य, तसेच नेमबाजीमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदकं भारतीयांनी जिंकली.सोमवारी नेमबाजीत 10m Men’s Air Rifle प्रकारात भारताने सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी यांदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. रुद्रांक्षने ६३२.५ गुणांसह आणि ऐश्वर्यने ६३१.६ गुणांसह वैयक्तिक गटाच्या फायनलमध्येही प्रवेश मिळवला.*

*👉🅾️🅾️👉नौकानयनमध्ये पुरुष सिंगल स्कलमध्ये भारताच्या बलराज पनवार याचे ७ सेकंदाच्या फरकाने कांस्यपदक हुंकले. त्याला ७:०८.७९ सेकंदाच्या वेळेसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.*

*👉🅾️🅾️👉दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या भारतीय नेमबाजांना चीन व दक्षिण कोरियाच्या खेळाडूंकडून कडवी टक्कर मिळाली. भारतीय खेळाडूंनी पहिल्या चार फेरीत 313.7, 315.9, 313.7, 315.9 असे गुण घेत कांस्यपदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले होते. पाचव्या फेरीत 308.2 गुणांसह भारतीय नेमबाजांनी थेट सुवर्णपदकासाठी अव्वल स्थानी मुसंडी मारली. या तिघांनी चीनचा ( ३ सप्टेंबर २०१८) १८८७.४ गुणांचा आशियाई स्पर्धा विक्रमही मोडला. अखेरच्या फेरीत त्यांनी 315.8 गुण कमावले अन् चीनचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. चीनने १९ ऑगस्ट २०२३ मध्ये बाकू येथे १८९३.३ गुणांची कमाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता.*

*👉🛑🛑👉ठाण्याचा रुद्रांक्ष हा वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्याने नेमबाजीचा वर्ल्ड कप जिंकला आणि डिसेंबर २०२२ मध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात अव्वल स्थान पटकावले. २०२२च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकून त्याने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही जिंकले होते.*

*👉🟥🟥👉पहिल्या दिवसाचे हायलाईट्स*

*नौकानयन स्पर्धेच्या दुहेरी लाइटवेट स्कल्समध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली. पुरुष कॉक्स एट गटातही भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात नीरज, नरेश कलवानिया, नितीश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, पुनीत कुमार आणि आशिष यांचा समावेश होता. यानंतर कॉक्सलेस दुहेरी प्रकारात भारताला बाबूलाल यादव-लेख राम यांनी कांस्य जिंकून दिले. नेमबाजीतही भारताने दोन पदकांची कमाई केली. महिला १० मीटर एअर रायफल प्रकारात ज्युनिअर विश्वविजेती रमिताने वैयक्तिक गटात कांस्य पदकाची कमाई केली. भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!