पुणे हे निसर्गोपचाराचे विद्यापीठ – ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे हे निसर्गोपचाराचे विद्यापीठ – ना. चंद्रकांतदादा पाटील

img 20230827 wa0026
क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे ऑटोमॅटिक थर्मल मसाज बेड व गोल्ड मॅट चे लोकार्पण*

पुणे हे निसर्गोपचाराचे विद्यापीठ झाले असून येथे विविध थेरपींच्या माध्यमातून नागरिकांच्या व्याधी दूर करण्याचे मोठे कार्य चालते असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या वतीने हैप्पी मेडिकेयरच्या ऑटोमॅटिक थर्मल मसाज बेड, जर्मेनियम गोल्ड मॅट आणि वेस्ट बेल्ट च्या सुविधाचे कोथरूड येथे अंतर्नाद योग केंद्रात लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग लि.चे सी. एम. डी अरुण जिंदल, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मा. नगरसेवक शाम देशपांडे, मा.दीपक पोटे,मा.जयंत भावे,मा. दिलीप उंबरकर, आर पी आय चे ऍड. मंदार जोशी,हैप्पी मेडिकेयर चे धनराज पाटील,भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,पतीत पावन संघटनेचे शहर पालक मनोज नायर,शहर चिटणीस प्रशांत हरसूले,डॉ. संदीप बुटाला,ऍड. मिताली सावळेकर,विश्वजित देशपांडे,उद्योजक सारंग राडकर, अक्षय मोरे, विशाल भेलके, सेवाव्रती फाउंडेशन चे प्रदीप देवकुळे,सार्थक हॉलिस्टिक हेल्थ केयर सेंटरचे सुनील ठिगळे,प्रभाग सरचिटणीस निलेश गरुडकर,ऍड.प्राचीताई बगाटे,संगीताताई आदवडे,संगीताताई शेवडे इ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांना भौतिक गरजा पूर्ण झाल्यानंतर शारीरिक व्याधीने ग्रासू नये अशी चिंता भेडसावते, धावपळीच्या दिनक्रमात विविध शारीरिक त्रास होतं असतातच, अश्या वेळी थर्मल मसाज,गोल्ड मॅट जर्मेनियम थेरपीने इतर व्याधी दूर करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. अश्या कल्पक व समाजोपयोगी उपक्रम घेऊन येणाऱ्यांसाठी माझं दार कायम उघडे असून अश्या प्रकल्पांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन नेहमीच सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन उपक्रम राबवत असते, त्यास अनुसरून गरजूना विविध आजारांवर, शारीरिक व्याधिंवर मोफत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन ने हे केंद्र सुरु केले असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.ही सुविधा मोफत उपलब्ध केली असून त्याचा लाभ घेण्यासाठी नावं नोंदणी आवश्यक असून गरजू व्यक्तींनी 9850999995 ह्या क्रमांकावर संपर्क केल्यावर, नोंदणी करून त्यांना ही सोय पूर्णपणे मोफत उपलब्ध केली जाईल असेही संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.तसेच पुणे परिसरातील विविध उद्योजकांनी लोकोपयोगी उपक्रमासाठी आपला सी एस आर निधी सढळपणे खर्च करावा व नागरिकांच्या गरजा ओळखून त्याचे नियोजन करावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले.
यापुढील काळात क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विविध लोकोपयोगी प्रकल्पांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे उद्योजक अरुण जिंदल म्हणाले. समाजातील उणीवा दूर करण्यासाठी व सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करण्यासाठी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग आपल्या सी एस आर निधीचा विनियोग करत असते त्यातून संदीप खर्डेकर सारख्या सामान्यांसाठी झटणाऱ्यांना मदत करताना विशेष आनंद होतो असेही अरुण जिंदल म्हणाले.
मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वस्ती विभागातील घरेलू कामगार महिलांना प्राधान्याने ही सुविधा उपलब्ध केली जाईल असे सांगितले.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष – क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995