श्रावण महिन्यानिमित्त विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध
आगारांच्या माध्यमातून ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे. या उपक्रमाचे कौतुक करतानाच महामंडळाने प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.