नवी दिल्ली : राज्यसभेतील २२५ खासदारांपैकी १२ टक्के म्हणजे २७ जण अब्जाधीश असून त्यात भाजपच्या ६ खासदारांचा समावेश आहे. अतिश्रीमंत खासदारांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणाचा वरचष्मा आहे असे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) या दोन संघटनांनी केलेल्या संयुक्त पाहणीच्या निष्कर्षांत म्हटले आहे, तर ७५ खासदारांवर ७५ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.*

*👉🔴🔴👉७ खासदारांची मालमत्ता ५,५९६ कोटी*

*तेलंगणातील ७, तसेच आंध्र प्रदेशमधील ११ राज्यसभा खासदारांची एकूण मालमत्ता अनुक्रमे ५,५९६ कोटी रुपये व ३८२३ कोटी रुपये आहे. उत्तर प्रदेशच्या ३० राज्यसभा खासदारांची मालमत्ता १९४१ कोटी रुपये आहे.*

*👉🛑🛑👉एडीआर व न्यूने राज्यसभेतील २३३ पैकी २२५ खासदारांच्या सांपत्तिक, तसेच अन्य बाबींबद्दल उपलब्ध माहितीचे विश्लेषण केले. राज्यसभेत सध्या एक जागा रिक्त आहे. तीन खासदारांची प्रतिज्ञापत्रे उपलब्ध होऊ शकली नाहीत, तर जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या ४ जागा अनडिफाइंड म्हणजे त्यांची वर्गवारी अद्याप निश्चित झालेली नाही.*

*🔺🔺३३ टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे*
*🔺🔺४१ जण गंभीर स्वरूपात आरोपी*
*🔺🔺२ खासदारांवर हत्येच्या गुन्ह्याची (भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२ नुसार) नोंद आहे.*
*🔺🔺४ खासदारांवर महिलांवर अत्याचार केल्याचा गुन्हा आहे.*
*🔺🔺बलात्काराचा (भारतीय दंडसंहितेचे कलम ३० नुसार) गुन्हा खासदार के. सी. वेणूगोपाल यांच्यावर आहे.*

*👉🅾️🅾️👉पक्षनिहाय १०० कोटींचे मालक*

*६ भाजप, ४ काँग्रेस, ३ आप, ३ भारास, २ राजद. वायएसआरसीपी ४*

*👉🔴🔴👉कोणत्या पक्षात जास्त गुन्हेगार*

*भाजप (८५ पैकी २३), काँग्रेस (३० पैकी १२), तृणमूल (१३ पैकी ४), राजद (६ पैकी ५), माकप (५ पैकी ४), आप (१० पैकी ३), वायएसआरसीपी (९ पैकी ३), गुन्हेगार खासदार राष्ट्रवादी (३ पैकी २)*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!