राम” ह्या शब्दाचे भगवान श्री श्रीधरस्वामींनी सांगितलेले महत्व

जगतपालक विष्णु व शिव ह्या महेर्देवता आहेत व त्यांचे महामंत्र
नमो ना *रा* यण (नारायण तारणारा असा त्याला नमस्कार)
व
न *म*: शिवाय (शिवाला नमस्कार) असे आहेत
ह्यातील *रा* व *म* हे त्या मंत्रातील बीज अक्षरे आहेत कारण ती अक्षरे काढल्यास
नमो नायण( न तारणार्यास नमस्कार)
न: शिवाय(शिव नसलेली सृष्टी)
मंत्राला अर्थ उरत नाही व विपर्यास होतो.
म्हणून ह्या मंत्रातील बीजक्षरापासून *रा* *म* हे नाम तयार होते
ह्या अर्थाने राम हा विष्णु व शिव ह्यांचा एकत्रित अवतार आहे
तसेच
*रा* हे अग्निबीज व *म* हे माया बीज आहे म्हणून राम राम म्हंटल्याने ज्ञानाग्नी ने माया नष्ट होते
वैखरीने राम राम म्हंटल्यास
रा म्हणताना मुख उघडे होऊन आतील पाप व दोष बाहेर पडतात व म म्हणता मुख बंद होऊन बाहेरील दोष आत येत नाहीत
योग मार्गातील लोकांसाठी सुद्धा नाम सांगितले आहे कारण
*रा* हे सहस्त्रासार चक्राचे स्थान म्हणजे शिव व *म* हे मुलाधाराचे स्थान म्हणजे जीव दर्शवते
राम राम म्हंटल्याने कुंडलिनी शक्ती मुलाधारपासून सहस्त्रासार येथे जाऊन जीव शिव ऐक्य होते.
म्हणून राम नामाचे महत्व अधिक आहे.