खोट्या ॲट्रॉसिटीचा निषेध म्हणून रेडा गावातील मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या रेडा गाव बंदला कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद

रेडा गावातील दोनशे ते तीनशे लोकांनी एकत्र येत निषेध केला.रेडा गावातील सर्व किराणा दुकान इतर व्यवसायिक, व्यापाऱ्याचे दुकाने, व्यावसायिक यांनी आपली दुकाने बंद ठेवून ग्रामस्थांच्या बंदला प्रतिसाद दिला आहे. तसेच निरा -भिमा सहकारी साखर कारखान्यावरती ही बाजारपेठा आणि व्यापारी वर्गांनी आपली दुकाने ,व्यावसायिक उद्योग बंद ठेवूनही या बंंदला मोठा प्रतिसाद दिला आहे. या बंदवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडुन मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सुद्धा गावात शांतता राखावे असे आहावान केले आहे.
तसेच मराठा समाजातील काही ग्रामस्थांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आमचे वार्ताहर यांच्याशी बातचीत केले असता त्यांनी असे म्हणाले की, सदर रेड्या गावाला वेगळ्या प्रकारचे वळण लागला असून कुठल्याही छोट्या मोठ्या कारणासाठी खोटे अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल केले जातात आणि नाहक समाजातील इतर समाजातील लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे पवार कुटुंब गावातील मराठा कुटुंब यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. आणि नाहक त्रास होत आहे. त्यामुळे गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. सदर खोट्या अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करणाऱ्या माने कुटुंबावर प्रशासनाकडून तात्काळ कडक कारवाई करावी अन्यथा आज रेडा गाव बंद ठेवले असून येत्या काही दिवसांमध्ये इंदापूर तालुका बंद ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे.
तसेच ठिक ठिकाणी रस्ता रोको आणि प्रत्येक गावामध्ये मराठा समाज तीव्र निषेध करेल असेही मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी आणि पदाअधिकारी बोलताना आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.सदर खोट्या अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करणाऱ्या माने कुटुंबावर प्रशासन कडक कारवाई करणार का ? आणि पवार कुटुंबावरती आणि मराठा समाजातील युवकांवरती होणाऱ्या अन्याय, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, गावातील पदाधिकारी राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यावरती होणाऱ्या अन्याला न्याय देणार का? याकडे इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. पवार कुटुंब व भटक्या समाजाकडूनही मोठ्या प्रमाणात तालुकाभर आंदोलन केले जाणार असल्याचेही बोलले जात आहे.