img 20230717 wa0033
पवार कुटुंब आणि रेडा गावातील मराठा समाजाला न्याय देणार कि, स्वतःची मान वाचवण्यासाठी प्रशासन या कुटुंबांना किती वेळा बळी देणार ?

रेडा ता.इंदापूर येथे मागील अनेक महिन्यांपासून माने कुटुंब व त्यांच्यातील तीस पस्तीस लोक हे पवार कुटुंबीयांच्या मालकी हक्काच्या शेतातील बळजबरीने व जातीवाचक कायद्याचा फायदा घेऊन पवार कुटुंबीयांच्या वरती अन्याय करत आहे.तसेच त्यांच्यात वाद आहे. त्यातूनच मागील महिन्यात माने कुटुंबियातील एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न बारामती येथील प्रशासकीय कार्यालयासमोर प्रशासन यांच्याविरोधात केला होता.

पवार यांच्यावर तीन वेळा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता चौथा अॅट्रोसिटीचा गुन्हा रेडा गावातील पवार कुटुंबीयांच्या वरती आणि रेडा गावातील नानासाहेब देवकर, आत्माराम देवकर, धनंजय गायकवाड या मराठा समाजातील नेत्यांवरही जून महिन्यात ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा समाजातील नेत्यांवर जाणून बुजून माने व पवार कुटुंबीयांच्या भांडणात काहीही संबंध नसताना ग्रामपंचायत मध्ये खोटी नोंद घेत नसल्याचा रोष मनात ठेवून खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

सर्व प्रकरणी कोमल प्रकाशन माने,लक्ष्मी रोहीदास माने, प्रकाश जनार्दन माने व त्यांची पत्नी,विशाल सिताराम माने, आहिलाजी भागवत माने, सुरेखा ओहिलाजी माने,धनंजय हरीबा माने, गणेश सुभाष माने व इतर ३० ते ३५ जन खोटेनाटे आरोप करणे, खोटया ऑटॉसिटीचे गुन्हे दाखल करणे, प्रशासनाला वेटीस धरणे, बेकादेशीर आंदोलन करणे, बेकायदेशीर कुणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे,फोन काॅल रेकॉर्डिंग करणे, खाजगी मालकीचे रस्ते आमच्यात आहेत म्हणून बळजबरीने जिल्हाधिकारी, एसपी ऑफिस, डी. वाय.एसपी , प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे खोट्या तक्रारी करणे तसेच उपोषण , आंदोलन करणे, यूट्यूब चैनलला एकतर्फी खोट्या बातम्या देऊन बदनामी करणे असे प्रकार करत आहेत व नाहक त्रास देत असल्याने रेडा गावातील भटक्या समाजातील पवार कुटुंब हे अतिशय तणावग्रस्त असून त्याचप्रमाणे रेडा गावातील मराठा समाजात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व गोष्टीला जबाबदार माने कुटुंबातील ही व्यक्ती आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात स्पष्ट म्हटले आहे.त्याचा निषेध म्हणून मंगळवार दि. १८ जुलै रोजी रेडा गाव बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. यासंबंधीचे सविस्तर निवेदन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. निवेदन देता वेळी रेडा गावातील मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
______________
फोटो ओळी:-
रेडा गावातील सकल मराठा समाज बांधव इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांना आंदोलनाचे निवेदन देत असतात.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!