चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली……
चेतना इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री उदय सदाशिव देशपांडे व सचिव विलास नामदेव भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोक आणि करण्यात आली. स्कूलच्या मुख्याध्यापिका निकिता माने मॅडम यांच्या हस्ते अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून गुरुचे महत्व गोष्टी रूपाने सांगितले, यावेळी हर्षदा चौधरी पूनम सरडे फौजी पठाण अश्विनी देशमाने प्रांजली सुतार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ माने सरांनी केले. आभार पूनम सरडे यांनी मांडले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका निकिता माने मॅडम यांनी केले, कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली.