बुलढाणा बस अपघाताच्या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी हळहळले;*
*👉🅾️🅾️👉मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर*


*👉🟣🟣👉समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.तर ८ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला असून बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.*

*👉🅾️🅾️👉याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी बुलढाण्याजवळ टायर फुटल्याने बस अनियंत्रित होऊन डिव्हायरला धडकली. ज्यानंतर बसने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला…*

*👉🟥🟥👉काय म्हणाले; पंतप्रधान नरेंद्र मोदी…*

*महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!