img 20230628 wa0005
नवी दिल्ली :-राज्यसभेच्या तीन राज्यांमधील १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील या जागांवरील सदस्य जुलै-ऑगस्टमध्ये निवृत्त होत असल्यानं निवडणूक घेण्यात येणार आहे.पुढील महिन्यात २४ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे, निवडणूक आयोगानं याची घोषणा केली आहे.*

*👉🔴🔴👉केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही गुजरातमधील जागेवरील खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. त्याचबरोबर दिनेशचंद्र जेमलभाई अनवादिया आणि लोखंडवाला जुगलसिंह माथुरजी या भाजपच्या गुजरातमधील तीन खासदारांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी संपणार आहे.त्याचबरोबर गोव्यातील भाजपचे खासदार विनय डी तेंडुलकर यांचा कार्यकाळ २८ जुलै संपणार आहे. तर पश्चिम बंगालमधून सर्वाधिक ६ जागांवरील खासदारांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या खासदारांमध्ये तृणमुल काँग्रेसचे खासदार देरेक ओब्रिअन, डोला सेन, सुश्मिता देव, शांता छेत्री, सुखेंदू शेखर राय आणि काँग्रेस खासदार प्रदीप भट्टाचार्य यांचा समावेश आहे.*

*👉🅾️🅾️👉असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?*

*🔺🔺नोटिफिकेशन निघणार – गुरुवार, ६ जुलै २०२३*

*🔺🔺अधिसुचित करण्याची शेवटची तारीख – गुरुवार, १३ जुलै २०२३*

*🔺🔺अधिसुचत नावांची छाननी – शुक्रवार, १४ जुलै २०२३*

*🔺🔺नाव मागे घेण्याची शेवटची तारीख – सोमवार, १७ जुलै २०२३*

*🔺🔺निवडणुकीची तारीख – सोमवार, २४ जुलै २०२३*

*🔺🔺निवडणुकीची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत*

*🔺🔺🔺मतमोजणीचा दिनांक – सोमवार, २४ जुलै २०२३. सायं. ५ वाजेपर्यंत*

*🔺🔺निवडणुक कार्यक्रम समाप्त – बुधवार, २६ जुलै २०२३*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!