रत्नागिरी :- केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज रत्नागिरीत भाजपाच्या वतीने व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. आज सायंकाळी ५.०० वाजता पऱ्याची आळी येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.*

 

*👉🟥🟥👉सेवा, सुशासन व गरीब कल्याण साधणारे केंद्र सरकार ९ वर्षे पूर्ण करत आहे. यानिमित्त मोदी @ ९ हे अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. सरकारची व्यापारी धोरणं, व्यापारी वर्गाच्या अपेक्षा, व्यापारी बंधूंचे मनोगत अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्व व्यापारी बांधवांचे एकत्रीकरण आज मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याकरिता सर्व व्यापारी बंधूंनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाने केले आहे.*

 

*👉🅾️🅾️👉या मेळाव्याला भाजपाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळ माने उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी शहर, तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन व्यापारी मेळावा संयोजक तथा भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी यांनी केले आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!