पी.एम. किसानमध्ये १०८ बांगलादेशी नागरिकांचा समावेश,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार

img 20230623 wa0013
सिंधुदुर्ग :-पी. एम. किसान योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना डिगस (ता. कुडाळ) येथे १०८ बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यानी दिलेल्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी, तपासणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.*

*👉🅾️🅾️👉या समितीत अध्यक्ष उपविभागीय अधिकारी कुडाळ, सदस्य उपविभागीय पोलिस अधिकारी, सावंतवाडी, सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग, सदस्य तहसिलदार कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सदस्य गटविकास अधिकारी, कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी, कुडाळ जि.सिंधुदुर्ग. तसेच समितीस दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत.*

*👉🟥🟥👉कारवाईकडे जिल्हावासीयांचे लक्ष*

*दरम्यान, डिगस येथे १०८ बांगलादेशी नागरिकांनी पीएम किसान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेउन ही समिती गठीत केली आहे. आता समितीच्या अहवालानंतर काय पुढे येणार आणि कोणावर कारवाई होणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.*