चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे योग दिन उत्साहात साजरा

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे योग दिन उत्साहात साजरा
—————————————-
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला. या दिवसाचे महत्त्व जाणून चेतना इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सम समावेत योगाचे विविध प्रकारचे योगासने व प्राणायामे केली. योग शिक्षक म्हणून पुनम सरडे , हर्षदा चौधरी, सुतार मॅडम, देशमाने मॅडम यांनी सर्वांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले.
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे प्रत्येकाने दररोज व्यायाम प्रकार योगासने प्राणायामे केली पाहिजेत तरच आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहू शकतो असे मत प्राचार्य निकिता सोमनाथ माने यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले .