नमोन्युजनेशन  :-संपादकीय
*👉👉आशिया खंडातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

माळशिरस – ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल समोर येत असताना अनेक ग्रामपंचायतींवर सत्तांतर झालं असून अनेक ठिकाणी जुनेच सत्ताधारी विराजमान झाले आहेत. त्यातच आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर भाजपाच झेंडा फडकला आहे. भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाने या ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. अकलूज ही 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यापैकी 13 जागा विजयसिंह मोहिते पाटील गटानं पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे.*

*अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी लढत रंगली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते-पाटील गटानं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळतंय.*

*👉माळशिरस तालुक्यात काय स्थिती ?*

*संपूर्ण माळशिरस तालुक्याचा विचार केला तर तालुक्यावर पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. कारण माळशिरस तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि भाजपसाठी मोठा विजय ठरला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.*

*माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटानं सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा निकालही जाहीर झाला आहे. विठ्ठलवाडीमध्ये 7 पैकी 7 ही जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटानं आपला झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर उमेदवारांनी विजयी रॅली काढली. माळशिरससह पंढरपूर आणि सांगोल्यातही भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे.*

*रेडेर गणेशगाव आणि पिरळे ग्रामपंचायतीवरही भाजपच्या मोहिते पाटील गटाने सत्ता मिळवली आहे. त्याचबरोबर येळीव, विजयवाडी आणि खवळे ग्रामपंचायतीवरही विजयसिंह मोहिते पाटील गटाने विजय मिळवला आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!