सांगोला :- मोदी सरकारने नऊ वर्षात भारताचा सर्वागीण विकास केला असून सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्वाखाली देशाने 9 वर्षामध्ये सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशामध्ये व जगात लोकप्रियता वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचविण्याचे

काम प्रभावीपणे करावे असे मत भाजपाचे माढा लोकसभा | निवडणुक प्रमुख तथा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

सांगोला तालुक्यातील चिणके गावातील सोनारसिद्ध मंदिरात सांगोला तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत मीटिंग विथ टिफीन

बैठकीचे माजी आमदार प्रशांत परिचारक, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रशांत परिचारक बोलत होते. भाजप कार्यकर्त्यांच्या टिफिन बैठकीत प्रशांत परिचारक पुढे म्हणाले,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने जात, धर्म, पंथ न पाहता जनतेच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत.

चालू वर्षात देशातील 81 कोटी जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत वर्षभर मोफत धान्य दिले जात आहे.

केंद्र सरकारकडून हर घर हर जल योजना राबविली जात आहे. त्याचा लाभ सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावाला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा विकसित देश म्हणून | जगात उदयास येत आहे.राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करीत असल्याचे यावेळी प्रशांत परिचारक यांनी नमूद केले.

यावेळी टिफीन बैठकीत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच काशी विश्वनाथ व उज्जेन

येथील महाकाल मंदिरात कॉरिडॉरचे बांधकाम साकारले जात असून सोमनाथ व केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार देखील होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांचा विकास करीत आध्यात्मिक वारसा जपला आहे. जागतिक पातळीवर भारताला स्वाभिमान उपलब्ध करून देत आज भारताची प्रतिमा उंचावली आहे.

नऊ वर्षात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने जनतेचे भक्कम आशीर्वाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच देशाचा विकास होऊ शकला.

संरक्षण सज्जतेसह उद्योग, कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरणपायाभूत सुविधांचा विकास, वैद्यकीय सुविधा,

रेल्वेचे आधुनिकीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे विणलेले जाळे आदींसह विविध क्षेत्रात देशाने प्रगती केली असल्याचे चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.

भाजपच्या मीटिंग विथ टिफीन कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यावर

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोल राऊंड करीत स्वतःच्या घरून आणलेल्या भोजनाचा सामूहिकपणे आनंद घेतला.

यावेळी संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड, एन. वाय. भोसले, तानाजी वाघमोडे, डॉ. अनिल कांबळे, बाळाप्पा येलपले, दुर्योधन हिप्परकर, नवनाथ पवार, आनंद फाटे,

वसंत सुपेकर, शीतल लादे, संगीता चौगले, लक्ष्मण येलपले, शिवाजी आलदर, दिलीप सावंत, डॉ. मानस कमलापुरकर, अमोल लऊळकर, डॉ.नवनाथ मिसाळ, शिवाजी ठोकळे, संजय गंभीरे, संजय बाबर,

सोयजित केदार, दीपक केदार, पप्पू पाटील, विनोद उबाळे, भारत गडहिरे, राहुल व्हणमाने, भारत धनवडे, बंडू पवार, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!