मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानक बिघाडल्याने त्यांना सक्तीच्या विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.यातच आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येत असून फडणवीस या कार्यक्रमांना उपस्थित राहणार का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.*

*👉🔴🔴👉कर्नाटक विधानसभा निवडणुकीची जबाबदारी राज्यातील प्रमुख नेत्यांसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील सोपवण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी मागील काही दिवस कर्नाटकात भरउन्हात प्रचारदौरे, सभांचा धडाका लावला होता. तसेच काही दिवसांत राज्याच्या अन्य भागांत देखील फडणवीसांनी दौरे केल्याने या सर्व प्रवासाचा ताण त्यांना जाणवू लागला. त्यांनंतर त्यांची अचानक मंगळवारी प्रकृती बिघडली.*

*👉🅾️🅾️👉सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील ते थोडाच वेळ उपस्थित राहू शकले. त्यामुळे त्यांना आता सक्तीच्या विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, सत्तांतरण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील अशाच पद्धतीची तब्येत बिघाडली होती. सततचे दौरे. उशीरापर्यंत कार्यक्रम, अपुरी झोप यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!