सीबीआय संचालकपदी आयपीएस प्रवीण सूद यांची नियुक्ती!

*👉🔴🔴👉पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सीबीआय प्रमुखासाठी तीन नावांची निवड केली होती, त्यापैकी आयपीएस प्रवीण सूद यांच्या नावाला मान्यता देण्यात आली असून त्यांची सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांची नियुक्ती ही दोन वर्षासाठी असणार आहे.*
*👉🅾️🅾️👉सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ 25 मे 2023 रोजी समाप्त होत आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीची दि.13 (शनिवार) रात्री बैठक झाली.त्यामध्ये सीबीआयच्या संचालकपदासाठी 3 वरिश्ठ आयपीएस अधिकार्यांच्या नावांवर विचार करण्यात आला. आता अखेर प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. प्रवीण सूद हे सन 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.*