*केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला काल भीषण अपघात झाला. त्यात त्यांच्या पत्नी सौ. विजया नाईक यांचे निधन झाले.*
त्याच वाहनात जे अन्य होते त्यात *संघ प्रचारक डॉ. दीपक घुमे यांचेही दुर्दैवी निधन झाले.*

आयुर्वेद व्यासपीठ, ओक वनौषधी संशोधन संस्था, आरोग्य भारती या संघटनांमध्ये त्यांनी प्रदीर्घ , पूर्णवेळ काम केले . ओक वनौषधी संशोधन केंद्रामार्फत दुर्गम , क्षेत्रामधे विज्ञान मंडळे, बचत गट तसेच तेथील ‘राजमाची ‘मधाचे ब्रँडींग करुन विक्रीची व्यवस्था उभी करण्यामध्ये त्यांचे योगदान खूपच मोठे होते .

जनजाती क्षेत्रापासून ते उच्चभ्रू शहरी वर्तुळापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा सहज वावर आणि थेट संपर्क होता . प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख दुःखामध्ये व अडी अडचणीच्या प्रसंगांमधे ठामपणे ते सोबत उभे राहून समस्यांचे निराकरण करत असत.

प्रवासाचा वादळी वेग, अध्यात्मिक प्रवृत्ती, तहान भूक इ शरीराचे भान हरपून कामामधे अखंड झोकून देण्याचा स्वभाव,प्रश्न सोडवण्याची विशिष्ट आणि आग्रही पद्धती, सर्वस्पर्शी सपर्क ही त्यांची गुणसंपदा सर्वांसाठी प्रेरणादायी राहिल .

खूप मेहनती, परिश्रमी, सतत कार्यमग्न.. ओक वनौषधी म्हणजे राजमाची मध हे समीकरण त्यांच्या मुळेच तयार झाले….

 

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!