देशात कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपरची विक्री कायमची बंद..* *केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे आदेश

img 20230513 wa0002

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसह ईतर पाच कंपन्यांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिपची विक्री बंद करण्याचे आदेश श्रीमती निधी खरे मॅडम, केंद्रीय मुख्य आयुक्त यांनी दिले आहेत.
या क्लिप सीट बेल्ट न लावताना अलार्म बीप थांबवून ग्राहकांच्या जीवनाशी आणि सुरक्षिततेशी खेळतात, त्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन आहे.

अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि मीशो यांच्या विरोधात ग्राहक हक्कांचे उल्लंघन आणि अनुचित व्यापार पद्धतींचे अवलंब केल्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
ही बाब रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ग्राहक संरक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली आणि कारवाई करण्याची मागणी केली होती.

Amazon, Flipkart, Meesho, Snapdeal, ShopClues या क्लिप विक्री आज पासून बंद केली आहे.

“कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप वापरल्यामुळे विमा कंपनी विमा पॉलिसीं नाकारू शकते. प्रकरणांमध्ये दाव्याची रक्कम मागणाऱ्या ग्राहकांसाठी अडथळा ठरू शकते हे सांगणे अत्यावश्यक आहे, ज्यामध्ये विमा कंपनी हवाला देऊन दावा नाकारू शकते.
वाहनांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये फेरफार करणे यामुळे पोलीस, RTO सदरचे वाहन जप्त देखील करू शकतात.

CCPA ने या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना सर्व कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप आणि प्रवाशांच्या आणि लोकांच्या सुरक्षेशी तडजोड करणारे मोटर वाहन घटक कायमचे हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
या व्यतिरिक्त, अशा क्लिपचे उत्पादन किंवा विक्री करणार्‍यांची तक्रार करण्याचे आवाहन CCPA ने केले आहे.

ग्राहक संघटना आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांना अशी उत्पादने तयार होऊन बाजारात विकली जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
त्यामुळे ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, अशा क्लिप आढळून आल्यास / विक्री केल्यास तात्काळ अखिल भारतीय ग्राहक पंचायत 9545594959 व केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण com-ccpa.nic.in किंवा 1915 यावर तक्रार करण्याचे/ माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ऍड. तुषार झेंडेपाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत. 🙏🙏