माझ्या नावाने बनावट खातं,सावध रहा
IPS अधिकारी विश्वास नांगरे – पाटलांनी केलं आवाहन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid032sGCQ92VZfc8VWGfdmvhZANDNjBuvHCEQjP2TYCiJr9X8YL2ADMWwafM6apgNNigl&id=1187029518&mibextid=CDWPTG
*मुंबई:-सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एखाद्याचा मोबाईल हॅक करून किंवा सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुटण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांना सायबर भामट्याने दणका दिलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस महासंचालक असणाऱ्या विश्वास नांगरे-पाटील यांचे बनावट खाते साबयर गुन्हेगाराने तयार केल्याचं उघडकीस आलं आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: माहिती देताना आपले बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याचं सांगितलंय. तसंच त्या अकाउंटवरून लोकांशी संबंधित व्यक्ती बोलत असून चॅट करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.*

*👉🟥🟥👉याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. पण बनावट खात्यावरून येणाऱ्या मेसेजेसना रिप्लाय करू नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका. यातून फसणुकीचा प्रयत्न होऊ शकतो असंही विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय.*

*👉🅾️🅾️👉ऑनलाइन फसवणूक टाळायची कशी?*

*एखाद्या व्यक्तीच्या नावाने बनावट खाते तयार करून सायबर गुन्हेगार त्यामाध्यमातून फसवणूक करतात.बनावट खाते ज्या व्यक्तीच्या नावे तयार करण्यात आलंय त्यांच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवून पैशांची मागणीही केली जाते किंवा इतर माहिती मागण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारे ऑनलाइन माहिती शेअर करणं टाळलं पाहिजे. बनावट खात्याच्या माध्यमातून फसवणूक होत असल्यास ज्याच्या नावाने मेसेज येत आहेत त्याच्याशी फोनवरून किंवा थेट संपर्क साधून याबाबत विचारणा करून घ्या. बनावट खात्याच्या माध्यमातून फसवणूक केली जातेय असं निदर्शनास आल्यास याबाबत पोलिसात रितसर तक्रार दिल्यास फसवणूक टाळता येऊ शकते.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!