img 20230423 wa0005

गारपीट आणि वादळी वार्यामुळे पंढरपूर तालुक्यातील तारापूर, खरसोळी, मगरवाडी, परिसरातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना बसला असुन रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण बोबडे यांनी शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी याची प्रशासनातील अधिकारी यांचेकडे मागणी केली असुन नुकतेच मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आ. यशवंत माने यांचेकडेही शेतकर्यांना भरपाई मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी बोबडे यांनी केली आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आसमानी संकटानं सारं काही हिरावून नेलं. मात्र सरकरानं अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. यासाठी आता रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले असुन वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे नुकसान ग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून भरपाई द्यावी अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष दिपक भोसले यांचे नेतृत्वात आंदोलन छेडण्याचा ईशारा जिल्हा उपाध्यक्ष बाळासो बोबडे यांनी दिला आहे.पंढरपूर तालुक्यात तुंगत,तारापुर, मगरवाडी, सुस्ते, फुलचिंचोली, खरसोळी यासह ईतर ठिकाणी झालेल्या वादळी वार्यासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये द्राक्ष बागांचे नुकसान प्रचंड झाले आहे नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पिकाचे त्वरीत पंचनामे करण्यात यावेत यासाठी रयत क्रांती संघटनचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासो बोबडे यांनी नुकतेच आ. यशवंत माने यांनी भेट घेऊन तारापुर, मगरवाडी,खरसोळी परिसरातील शेतकर्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्न करून प्रशासनातील अधिकारी यांना सुचना देण्याची मागणी केली आहे. यावेळी

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!