*👉👉पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते,👉‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा*
*👉२०२१ चा पहिला दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हितचिंतकांसाठी चांगला ठरला. कारण, जागतिक नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणामध्ये, नरेंद्र मोदी जगातील सर्वात ‘स्वीकारार्ह’ नेते ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचे ‘अप्रूव्हल रेटिंग’ सर्वाधिक राहिले आहे. ५५ टक्के स्वीकृती रेटिंगसह नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांमध्ये अव्वल ठरलेत.*
*👉मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. तर २० टक्के लोकांनी मोदींना विरोध केला. त्यामुळे त्यांची एकूण स्वीकृती रेटिंग ५५ टक्के राहिली. जगातील इतर देशांच्या नेत्यांच्या तुलनेत मोदींची रेटिंग सर्वाधिक ठरली. संकेतस्थळानुसार, या सर्वेक्षणासाठी भारतात नमुन्यांचा आकडा २ हजार १२६ होता. तर, यामध्ये त्रुटीची शक्यता २.२ टक्के आहे.*
*👉या सर्वेक्षणात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वीकृत रेटिंग नकारात्मक राहिली. म्हणजेच बोरिस जॉन्सन यांना पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा त्यांचा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक होती. याशिवाय जर्मनीच्या लोकप्रिय चान्सलर एंजेला मार्केल यांची स्वीकृती रेटिंग २४ राहिली.*