पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई मिळावी – बोबडे

एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आसमानी संकटानं सारं काही हिरावून नेलं. मात्र सरकरानं अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. यासाठी आता रयत क्रांती संघटना रस्त्यावरची लढाई लढणार असुन नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी अन्यथा आंदोलनाचा ईशारा संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण बोबडे यांनी दिला आहे.

पंढरपूर तालुक्यातील कही गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले असुन वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे नुकसान ग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून भरपाई द्यावी अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष दिपक भोसले यांचे नेतृत्वात आंदोलन छेडण्याचा ईशारा जिल्हा उपाध्यक्ष बाळासो बोबडे यांनी दिला आहे.

पंढरपूर तालुक्यात तुंगत,तारापुर, मगरवाडी, सुस्ते, फुलचिंचोली, खरसोळी यासह ईतर ठिकाणी झालेल्या वादळी वार्यासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पिकाचे त्वरीत पंचनामे करण्यात यावेत यासाठी आज रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे यासंदर्भातील पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. संघटनचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासो बोबडे यांनी नुकतेच तारापुर, मगरवाडी,खरसोळी परिसरातील दादा तुकाराम जगताप, विठ्ठल दत्तात्रय माने ,प्रकाश नारायण गुंड, गोरख भानुदास वाघमोडे, जैनुद्दीन शेख सर, विक्रम आनंद शेळके, प्रदीप नागनाथ कदम तारापूर,प्रदीप शिरसागर, सत्यवान बापू क्षीरसागर,तानाजी नकाते, भास्कर भानुदास जगताप मगरवाडी, छगन पवार, काकासाहेब ताड, युवराज पवार, राजेंद्र पवार खरसोळी या शेतकर्यांचे पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.  प्रचंड अर्थिक फटका येथील शेतकर्यांना बसलेला आहे प्रशासनातील अधिकारी यांनी गांभीर्याने याकडे लक्ष देऊन शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावेत  अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी महसूल व कृषी विभागाच्या वतीने तात्काळ पंचनामा करावा आणि शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित अहवाल सादर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी  केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील तारापूर मगरवाडी परिसरातील बाधित शेतकर्यांचे पिकाची पाहणी कृषी सहाय्यक मयुर कोळी यांनी तातडीने केली असली तरी या परिसरातील बरेच शेतकर्यांचे गारपीटीने नुकसान झालेले आहे या सर्व शातकर्यांचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.