********************************
*@ १६ एप्रिल @*
*’मुंबई ते ठाणे’ दरम्यान प्रथम रेल्वे सुरू*
********************************

ऐतिहासिक भारतीय रेल्वेचा आज स्थापना दिन. भारतीय रेल्वे च्या आजपर्यंत च्या ऐतिहासिक प्रवास मध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या सर्व आजी माजी कर्मचाऱ्यांना या वर्धापन दिना च्या अगणित हार्दीक शुभेच्छा !

बरोबर १६ एप्रिल १८५३ म्हणजेच आजच्याच दिवशी धावली होती ठाणे बोरीबंदर दरम्यान पहिली रेल्वे. आणि पुढील काळात याच रेल्वेची चाके धावली १८५४ मध्ये कल्याण पर्यत,१८६० मध्ये भुसावळ पर्यत, १८६७ मध्ये नागपुर पर्यंत पुढे मनमाडमार्गे थेट जम्मू पर्यंत. त्यामुळे रेल्वे बरोबर मनमाडचे नाव जोडले गेले ते कायमचेच.जम्मू पर्यंतच्या या मार्गातील मनमाड हे एक महत्वाचे रेल्वे स्थानक. मनमाड रेल्वे स्थानक चे उदघाटन १८६६ साली झाले, तर मनमाड रेल्वे विद्युतीकरण १९६८ साली झाले. लोखंडाला गंज लागू नये म्हणून मनमाडचं वातावरण पोषक त्यामुळे येथे रेल्वेचा कारखाना झाला, तर देशाच्या विविध भागात जाण्यासाठी येथे रेल्वेचे मोठे जाळे विणले गेले.

मनमाड रेल्वे स्थानक जंक्शन झाले, मनमाडला रेल्वे आली आणि मनमाडचं नाव रेल्वेच्या चाकांबरोबर सर्वदूर गेले हजारो हातांना काम मिळाले. आजही मनमाड शहरची अर्थ व्यवस्था ८०% रेल्वे वरच अवलंबून आहे. उत्तर महाराष्ट्र चे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड हुन भारतात चारही दिशाना जाण्यासाठी प्रवासी रेलवे आहेत. दररोज २५००० पेक्षा जास्त प्रवासी मनमाड रेल्वे स्थानका त येजा करतात. ९ प्रवासी रेल्वे गाड्या मनमाडहुन सुटुन मनमाड ला टर्मिनेट होतात. करोडो रूपयाचे उत्पन्न रेल्वे ला मनमाड स्टेशन दररोज देत आहे. सुमारे १५० प्रवासी नि १०० पेक्षा जास्त मालवाहतूक रेल्वे गाड्या मनमाड रेल्वे स्थानकातुन दररोज धावतात.

मनमाड रेल्वे स्थानकातून काही कोटी चा व्यवहार माल वाहतुकीच्या दळण वळणातुन दररोज होतो आहे. ५ हजार पेक्षा जास्त चाकरमाने या रेल्वे द्वारे रोज उपडाउन करतात. रेल्वे ब्रिज कारखाना व इतर विभाग मिळून काही हजार कामगार येथे काम करतात. सध्या मनमाड रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचे कार्य रेल्वे प्रशासन द्वारा युद्ध पातळी वर सुरु असून रेल्वे स्थानका मध्ये प्रवासी सोयी साठी नवीन पादचारी पुल निर्माण करण्यात आला, सरकते जिने सुरु करण्यात आले, लिफ्ट बसवन्यात आली, भव्य नवीन वाहनतळ उभारले गेले आहे, प्रवासी सुरक्षे साठी रेल्वे स्थानकाला संरक्षण भिंत उभारली गेली आहे तसेच संपूर्ण रेल्वे स्थानकात सी सी टीवी कैमरे बसवले आहेत. आगमी काळात नवीन पार्सल कार्यालय, भव्य प्रवेशद्वार, भव्य सर्व सामान्य प्रवासी प्रतीक्षालय, आधुनिक व्यापार संकुल, भव्य विश्रांति गृह, निर्माण प्रस्तावित आहेत. लवकरच मनमाड इंदौर या रेल्वे महामार्गाचे कार्य सुरू होणार आहे, त्यामुळे मनमाची अर्थव्यवस्था शक्तिशाली होईल.

कारण रेल्वे म्हटली की मनमाड, आणि मनमाड म्हटलं की रेल्वे हे नातं अगदी घट्ट झालं आहे अगदी मायलेकरावाणी. भारतीय रेल्वे ला आणि सर्व रेल्वे अधिकारी ,कर्मचारी बंधु भागिनिना, सर्व रेल्वे प्रवासी वर्गाला या रेल्वेच्या वर्धापन (स्थापना) दिनाच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा !

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!