१६ एप्रिल जागतिक ध्वनी दिवस

********************************
*@ १६ एप्रिल @*
*जागतिक ध्वनी दिवस*
********************************

आज जागतिक आवाज दिवस (वर्ल्ड व्हॉइस डे) !

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार १६ एप्रिल हा दिवस जागतिक आवाज दिवस म्हणून पाळला जातो. आवाजाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याची काळजी कशी घ्यायची याचे प्रबोधन करण्यासाठी ब्राझील मध्ये हा उपक्रम १६ एप्रिल १९९९ रोजी सुरु झाला. हल्लीच्या जीवनात नावासोबतच आवाजालाही महत्त्व आहे. निसर्गाने प्रत्येकाला जसा वेगळा चेहरा, शरीररचना दिली, तशीच आवाजाची अर्थात ध्वनीची देणही दिली आहे.

एका व्यक्तीचा आवाज दुसऱ्या व्यक्तीशी मिळता जुळता असू शकतो, पण तो हुबेहूब असू शकत नाही. आवाज देखील व्यक्तीची ओळखच असते. त्यामुळे उगाच एखाद्याच्या आवाजाची नक्कल करून निसर्गाशी खेळण्याचा मोह टाळा. अन्यथा स्वरयंत्र म्हणजेच वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर व्होकल कॉर्डला न भरून निघणारी हानी होऊ शकते, असा आरोग्यमंत्र कान-नाक-घसा तज्ज्ञ देत असतात.

*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************